दि. २९.०८.२०२३
गोंडवाना विद्यापीठात राष्ट्रीय क्रिडा दिन साजरा...
गडचिरोली : युवा कार्य व क्रिडा मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली यांनी २९ ऑगस्ट "राष्ट्रीय क्रिडा दिन" म्हणून साजरा करणे बाबत दिलेल्या निर्देशानुसार स्वस्थ जीवनातील क्रीडाचे महत्व संबंधी जनजागृती करण्याच्या उद्धेशाने राष्ट्रीय क्रिडा दिवस गोंडवाना विद्यापीठात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने विद्यापीठ सभागृहात संचालक राष्ट्रीय सेवा योजना डॉ. श्याम खंडारे आणि संचालक, क्रीडा व शारीरिक शिक्षण विभाग, डॉ. अनिता लोखंडे व अन्य कर्मचारी उपस्थित होते. डॉ. श्याम खंडारे यांनी सर्वाना फिट इंडिया ची शपथ दिली व विद्यार्थ्याना आरोग्यासंबंधी व वेगवेगळ्या खेळांसंबंधी मार्गदर्शन केले. डॉ. अनिता लोखंडे यांनी विद्यापीठात खेळासंबंधी उपलब्ध असलेल्या संधींबद्दल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाची प्रस्तावना कार्यक्रम समन्वयक, रा. से. यो., पदव्युत्तर शैक्षणिक विभाग, प्रमोद जावरे यांनी केली व आभार सतीश पडोळे यांनी मानले. या प्रसंगी रा से यो स्वयंसेवक उपस्थित होते.