दि. १६.०८.२०२३
Vidarbha News India
Rain Forecast in Maharashtra :
राज्यात गायब झालेला पाऊस उद्यापासून पुन्हा सक्रीय होणार; काय आहे हवामान विभागाचा अंदाज?
विदर्भ न्यूज इंडिया
Rain Update Maharashtra : राज्यातील सर्वच भागात मागील दोन आठवड्यांपासून पावसाने दडी मारली आहे. जुलै महिन्यात धो-धो पडलेला पाऊस ऑगस्ट महिन्यात गायब झाला आहे. यामुळे शेतकरी चिंतेत आहे. मात्र सर्वांसाठी एक आनंदाची बातमी आहे.
गेल्या ४-५ दिवसांपासून पावसाने राज्यात विश्रांती घेतली आहे. विदर्भ, मराठवाडा, कोकणात उद्यापासून पावसाला सुरुवात होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. काही भागात येलो अलर्ट देखील असण्याची शक्यता आहे. (Latest Marathi News)
राज्यात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पावसाने काही काळ ओढ दिली होती. मात्र येत्या १८ आणि १९ ऑगस्ट रोजी राज्यातील काही भागात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार 18 ते 24 ऑगस्ट दरम्यान पाऊस पुन्हा एकदा जोर धरेल. (Maharashtra News)
मराठवाड्यातही पावसाची अंदाज
मराठवाड्यातऑगस्ट महिन्यात ८५ टक्क्यांहून कमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे सुरुवातीच्या पावसात झालेली पिकांची लागवड धोक्यात आली आहे. आता पाऊस झाला नाही तर दुबार पेरणीचं संकट शेतकऱ्यांवर आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार मराठवाड्यात पावसाने हजेरी लावल्यास तेथील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळू शकतो.
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी पाहायला मिळेल. तर, पश्चिम, मध्य आणि दक्षिम महाराष्ट्रात मात्र पावसाची ये-जा असेल. तर मराठवाड्यातही विविध भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. पश्चिम, मध्य आणि दक्षिम महाराष्ट्रात मात्र पावसाची ये-जा असेल.