दि. १४.०८.२०२३
देशासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या, देशसेवा करणाऱ्यांचा सन्मान करण्यासाठी वीरांना वंदन; - आ. डॉ. देवराव होळी
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : नगरपरिषद गडचिरोलीच्या वतीने "मेरी माटी मेरा देश" कार्यक्रमांतर्गत स्वातंत्र्य सैनिक ,वीरांना वंदन व पंचप्राण शपथ कार्यक्रमाचे जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजन..
देशाचे लोकप्रिय पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांनी "मेरी माटी मेरा देश" या कार्यक्रमांच्या माध्यमातून देशासाठी आपले सर्वस्व अर्पण करणाऱ्या शहिदांना,, देशसेवेत कार्य करणाऱ्या वीरांना ,स्वातंत्र्य सैनिकांना आदरांजली अर्पण करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले असून या आजच्या कार्यक्रमातून आपण या सर्वांना वंदन नमन करावे असे प्रतिपादन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ देवराव जी होळी यांनी नगरपरिषद गडचिरोलीच्या वतीने "मेरी माटी मेरा देश" कार्यक्रमांतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित शहीद ,स्वातंत्र्य सैनिक ,वीरांना वंदन व पंचप्राण शपथ कार्यक्रमाच्या प्रसंगी केले.
यावेळी मंचावर खासदार अशोकजी नेते , जिल्हाधिकारी गडचिरोली माननीय संजय जी मीना ,लोकसभा प्रभारी जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सूर्यकांतजी पिदुरकर, शहराचे भाजपा अध्यक्ष तथा माजी नगरसेवक मुक्तेश्वरजी काटवे, माजी नगरसेवक केशवजी निंबोळ ,माजी नगरसेविका वैष्णवी नैताम, प्रामुख्यानं उपस्थित होते.