दि. ३०.०८.२०२३
स्कूल ऑफ स्कॉलर्स बेलतरोडीच्या विद्यार्थ्यांचे बुद्धिबळात वर्चस्व
विदर्भ न्यूज इंडिया
प्रतिनिधी/नागपूर : क्रीडा अधिकारी कार्यालय, नागपूर तर्फे आयोजित तालुका स्तरिय शालेय बुद्धिबळ स्पर्धा नुकत्याच स्कूल आँफ स्कॉलर्स बेलतरोडी येथे घेण्यात आली. या तालुकास्तरीय स्पर्धेच्या कार्यक्रमाचे अध्यक्षा संचालिका आभा मेघे, स्कूल ऑफ स्कॉलर्सच्या प्राचार्या डॉ. उमा भालेराव, प्रमुख पाहुणे तालुका संयोजक उमेश चौरे व स्वाती पाणबुडे उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती वंदना विनया जाधव यांनी सादर केली. प्रास्ताविक डॉ. उमा भालेराव यांनी केले. खेळाचे नियम व अटी स्वाती पाणबुडे यांनी खेळाडूला सांगितले. अध्यक्षीय भाषणात आभा मेघे यांनी सरस्वती मातेला 64 कला अवगत होत्या त्याप्रमाणे बुद्धिबळ खेळ खेळतांना 64 घरात गोट्या खेळतांना कौशल्यांचा कस लागतो, व मुलांना शुभेच्छा दिल्या.
19 वर्ष वयोगटात मुलांमध्ये "प्रथम स्कूल ऑफ स्कॉलर्स स्कूल बेलतरोडी स्पंदन राॅय, अमित देशमुख, स्नेहा पाठक यांनी पटकावला, व व्दितीय क्रमांक दिल्ली पब्लिक स्कूल लावा यांनी पटकावला आहे. 19 वर्ष मुलिंच्या वयोगटात प्रथम व द्वितीय क्रमांक जैन इंटरनॅशनल स्कूल यांनी पटकावला. तसेच कार्यक्रमाचे सुत्रसंचालन वैदेही धाबू यांनी केले व स्पर्धा यशस्वी होण्यासाठी स्कूल ऑफ स्कॉलर्सच्या प्रशासनिक अधिकारी निलय वासाडे, उपप्राचार्या पुजा महावादीवार, क्रीडा शिक्षक चारूशिला शेट्टीवार, सतीश भालेराव, अक्षय इंगळे, सचिन चौधरी, तन्मय पिंपळे,पंकज मस्के,अरविंद हिवसे,अतुल तांबे व स्कूल ऑफ स्कॉलर्स शाळेचे सर्व शिक्षक व यांच्या सहकार्याने स्पर्धा यशस्वी रित्या पार पडली. विजयी संघाना जिल्ह्यास्तरिय स्पर्धेकरिता शुभेच्छा देण्यात आल्या.