गडचिरोली : शेतात कुजलेल्या स्थितीत आढळला मृतदेह; पोलिसांत तक्रार दाखल - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



"विदर्भ न्यूज इंडिया" कडून वाचक,जाहिरातदार,हितचिंतक व समस्त जनतेला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...

गडचिरोली : शेतात कुजलेल्या स्थितीत आढळला मृतदेह; पोलिसांत तक्रार दाखल

दि. ०७.०८.२०२३

Vidarbha News India

गडचिरोली : शेतात कुजलेल्या स्थितीत आढळला मृतदेह; पोलिसांत तक्रार दाखल

विदर्भ न्यूज इंडिया

गडचिरोली : सिरोंचा तालुक्यातील पोचमपल्लीजवळ प्राणहिता नदीकाठावरील शेतात ५ ऑगस्ट रोजी कुजलेल्या स्थितीत एका इसमाचा मृतदेह आढळून आला. यासंदर्भात बामणी उप पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली. पोचमपल्ली येथील मलय्या दुर्गम यांचे शेतात कपाशीची लागवड केली आहे. सदर कपाशीत एका इसमाचे प्रेत असून त्याची दुर्गंधी सुटल्याची माहिती गावात पसरली. त्यावरून गावातील लोकांनी जाऊन पाहिले असता जवळपास ४० ते ४५ वयाच्या अनोळखी इसमाचे प्रेत कुजलेल्या स्थितीत दिसून आले. याबाबत बामणी उप पोलिस स्टेशनमध्ये तक्रार करण्यात आली. परंतु त्या व्यक्तीची अद्यापही ओळख पटली नाही. सदर इसमाची उंची अंदाजे ५ फुट ७ इंच आहे. त्याच्या अंगात कत्त्या रंगाची टी-शर्ट आणि काळ्या रंगाचा फुल पॅन्ट आहे, असे बामणी उप पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक मदन मस्के, चौकशी अधिकारी पीएसआय संभाजी मुंडे यांनी कळविले.

Share News

copylock

Post Top Ad

-->