Vidarbha News India
गडचिरोली जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ५८१ जागा...
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली :
जिल्हापरिषद, गडचिरोली यांच्या आस्थापनेवरील रिक्त असलेल्या गट-क संवर्गातील विविध पदांच्या एकूण ५८१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ५८१ जागा
आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सेवक (पुरुष), आरोग्य परिचारिका/ आरोग्य सेवक (महिला), औषध निर्माण अधिकारी, कंत्राटी ग्रामसेवक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ आरेखक, कनिष्ठ लेखाधिकारी, कनिष्ठ सहाय्यक (लिपिक), कनिष्ठ सहाय्यक लेखा, पशुधन पर्यवेक्षक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, रिगमन (दोरखंडवाला), लघुलेखक (उच्च श्रेणी), लघुलेखक (निम्नश्रेणी), वरिष्ठ सहाय्यक, वरिष्ठ सहाय्यक लेखा, विस्तार अधिकारी (कृषि), विस्तार अधिकारी (शिक्षण), स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, पर्यवेक्षिका आणि यांत्रिकी पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदानुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ५ ते २५ ऑगस्ट २०२३ दरम्यान ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
अधिकृत वेबसाईट