दि. ०८.०९.२०२३
अंबुजा सिमेंट फाऊंडेशनच्या वतीने मालेवाडा येथे शेतकऱ्यांना मार्गदर्शन...
विदर्भ न्यूज इंडिया
नागपूर : भिवापूर तालुक्यातील मालेवाडा या गावात अंबुजा सिमेंट फाऊंडेशन च्या शेतकऱ्यांना कापूस पिकावर मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी कापुस पिकावरील रस शोषण करणारे किटक आणि कापुस पिकावरील बोंडअळ्या याविषयी शेतकऱ्यांना माहिती दिली.
यावेळी मालेवाडा येथील समाज भवन येथे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी अंबुजा सिमेंट फाऊंडेशन च्या वतीने वैष्णवी थेरे व सोनाली हातागर, तुळनकर साहेब, संदीप लोखंडे या चमूने पाणी व्यवस्थापन, नत्रयुक्त खते देण्याची पद्धती व किटकनाशकांची सुरक्षित हाताळणी कश्याप्रकारे करावी याबाबत मार्गदर्शन केले.
असुरक्षित फवारणीचे होणारे दुष्परिणाम, जैवविविधता शेतीच्या नफ्याला कशी मदत होईल, सप्टेंबर महिना अन्नद्रव्य व्यवस्थापनासाठी महत्वाचा का असतो? अश्या अनेक समस्या दूर करण्यासाठी शेतकऱ्यांना या विषयी माहिती देण्यात आली.
यावेळी शेतकरी सरपंच विष्णू कोडापे, विलास मेश्राम, श्याम राऊत, देविदास खंडाळ, बाळकृष्ण सहारे, आनंदराव सातपुते, रामु लाखे, संजय नेवारे, डोमा सहारे, ज्ञानेश्वर सहारे आदी मालेवाडा येथील शेतकरी उपस्थित होते.