भाजपा गडचिरोलीच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर,आरोग्य तपासणी शिबिर तसेच आयुष्यमान भारत कार्डचे वितरण - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

Advertise

भाजपा गडचिरोलीच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर,आरोग्य तपासणी शिबिर तसेच आयुष्यमान भारत कार्डचे वितरण

दि. २७.०९.२०२३
Vidarbha News India 
भाजपा गडचिरोलीच्या वतीने रामनगर येथे भव्य रक्तदान शिबिर,आरोग्य तपासणी शिबिर तसेच आयुष्यमान भारत कार्डचे वितरण
- मा.पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या जन्मदिवसानिमित्त रामनगर (तुकडोजी चौक) येथे "सेवा सप्ताह पंधरवाडा" कार्यक्रम संपन्न
विदर्भ न्यूज इंडिया 
गडचिरोली : मा. पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त "सेवा सप्ताह पंधरवाडा" या कार्यक्रमांतर्गत भारतीय जनता पार्टी गडचिरोली शहराच्या वतीने स्थानिक रामनगर तुकडोजी चौक प्रभाग क्र.४  येथे भव्य रक्तदान शिबिर,आरोग्य तपासणी शिबिर व आयुष्यमान भारत कार्डची नोंदणी व वितरण करण्यात आले.
या कार्यक्रमाचे उद्घाटन खासदार अशोकजी नेते,जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे यांच्या हस्ते तर जिल्हा महामंत्री प्रकाशजी गेडाम, लोकसभा समन्वयक प्रमोदजी पिपरे,जिल्हा महामंत्री तथा माजी नगराध्यक्ष सौ. योगीताताई पिपरे, किसान आघाडी प्रदेश सदस्य रमेशजी भुरसे,शहर अध्यक्ष मुक्तेश्वरजी काटवे,महिला आघाडी जिल्हाध्यक्ष गीताताई हिंगे,शहराध्यक्ष कविताताई उरकुडे,भाजयुमो जिल्हाध्यक्ष अनिल तिडके यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.  
याप्रसंगी खासदार अशोकजी नेते,जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे व लोकसभा समन्वयक प्रमोदजी पिपरे यांनी आरोग्य तपासणी करून घेतली तसेच येथील बहुसंख्य नागरिकांनी शुगर,बीपी,कॅन्सर,नेत्र तपासणी, मुख रोग तपासणी, सिकलसेल इत्यादींची आरोग्य तपासणी करून घेतली व आभा कार्डचा लाभ घेतला.
जिल्हा सामान्य रुग्णालयाचे डॉ. व आरोग्य सेविका यांच्या चमुने आरोग्य तपासणी करून उपचार पध्दती सांगितली. तर आशा सेविका यांनी आयुष्यमान भारत कार्डची नोंदणी करून कार्डचे वितरण केले.
याप्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष अनिल पोहनकर,शहर उपाध्यक्ष विवेक बैस,महिला आघाडी जिल्हा सचिव लक्ष्मीताई कलंत्री,महामंत्री वैष्णवी नैताम,रश्मीताई बाणमारे,शहर महामंत्री केशव निंबोड,माजी नप उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर,कोमल बारसागडे,हर्षल गेडाम,सुरेश मांडवगडे,कवडूजी येरमे,विलास नैताम,अर्चना निंबोड,मंदाताई मांडवगडे,आरोग्य सेविका,आशा सेविका,भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रक्तदान शिबिरामध्ये संजय मांडवगडे,मंगेश मसराम,नरेश पिपरे,आकाश श्रीरामे,दिनेश भुरसे,ज्योतिर्मय कोहळे,अंकुश भुरसे,गौतम काळे,गिरीधर पराते,अमित हेमके,रुपेश पोरटे,हर्षद तांगडे,रुपेश चुनूरवार,अंकुश कुकुडकर,आनंद सातपुते,मनीषा कुंठावर,सागर बोधलकर,नितीन वडपल्लीवार,आनंद धोडरे या रक्तदात्यांनी यावेळी रक्तदान केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महिला आघाडी जिल्हा सचिव वर्षाताई शेडमाके, बुथ प्रमुख संजय मांडवगडे,पुनम हेमके,विक्की कोवे यांनी परिश्रम घेतले.

Share News

copylock

Post Top Ad

-->