दि.०७.०९.२०२३
घोट पोलिस मदत केंद्राच्या हद्दित ४ लाख २७ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त.!
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील घोट पोलिस मदत केंद्राच्या हद्दितील कोळसेगट्टा गावाजवळ पोलिसांनी सापळा रचुन ४ लाख २७ हजार २०० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.
या प्रकरणी आरोपी विश्वनाथ नानाजी पदा (२७) रा.पोतेपल्ली हा अवैध दारूची वाहतूक करत असताना त्याचे ताब्यातून २७, २०० किमतीची देशी दारू आणि ४ लाख रु. किमतीची महिंद्रा कंपनीची झायलो गाडी जप्त करण्यात आली.
घटनेसंदर्भात घोट पोलिस मदत केंद्रात क्र. ४८/ २०२३ कलम ६५(अ), ९८ (क) महाराष्ट्र दारूबंदी कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. सदरची कारवाई घोटचे ठाणेदार सहायक पोलीस निरीक्षक नितेश गोहणे, सोळुंके, शेळके व कर्मचारी यांनी केली. ठाणेदार नितेश गोहणे यांच्या कारवाईमुळे दारूतस्करांचे धाबे दणाणले आहे.