दि. २४.०९.२०२३
Vidarbha News India
खासदार अशोकजी नेते यांनी गडचिरोली शहरात विविध ठिकाणी गणपती बाप्पाचे घेतले दर्शन...
गडचिरोली : दरवर्षीप्रमाणे याही वर्षी विधिवत परंपरेने मोठ्या आनंदाने, उत्साहाने गणपती बाप्पाची स्थापना केली.
गडचिरोली शहरात खासदार अशोकजी नेते यांनी दि. २३ सप्टेंबरला सायंकाळी, माजी सभापती रंजिताताई कोडापे, भाजपाचे जेष्ठ नेते गजाननराव येनगंदलवार, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अरुणजी हरडे यांच्या घरगुती गणपती बाप्पाचे दर्शन घेत,पूजा अर्चना करून महाप्रसादाचा आनंद घेतला.
भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष भारतजी खटी यांनी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपल्या स्वगृही महालक्ष्मी, ज्येष्ठा गौरी पुजनाचे आयोजन केले.याही कार्यक्रमाला खासदार अशोक जी नेते यांनी उपस्थित राहून महाप्रसादाचा आस्वाद घेतला.
गडचिरोली शहरातील अशा विविध ठिकाणी खासदार अशोक जी नेते यांनी घरगुती विघ्नहर्ता गणपती बाप्पा चे दर्शन, महालक्ष्मी,जेष्ठा गौरी पूजा अर्चना करत जनतेला सुख-समृद्ध आरोग्य संपन्न लाभो अशी गणपती बाप्पा चरणी प्रार्थना केली. यावेळी सर्वांच्या भेटीगाठी घेऊन आनंद झाला अशा भावना खासदार अशोक जी नेते यांनी व्यक्त केल्या.
याप्रसंगी खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनू.जनजाती मोर्चा चे अशोकजी नेते, भाजपाचे ज्येष्ठ नेते तथा प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाबुरावजी कोहळे, प्रदेश सरचिटणीस एस.टी.मोर्चाचे प्रकाश गेडाम, जिल्हा उपाध्यक्ष डॉ.भारत खटी,सामाजिक नेते रामायण खटी,जिल्हा उपाध्यक्ष प्रणय खुणे,जिल्हा उपाध्यक्ष अनिल पोहणकर, प्रशांत भूगूवार, युवा नेते संजय बारापात्रे आशिष कोडापे,भाजपाचे युवा नेते अनिल करपे,माजी शहर अध्यक्ष पल्लवी बारापात्रे तसेच मोठ्या संख्येने भाविक भक्त उपस्थित होते.