दि. २६.०९.२०२३
शेतकर्यांच्या नुकसान भरपाईच्या मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन.!
- शेतकऱ्याचा दिसून आला आक्रोश..!
विदर्भ न्यूज इंडिया
प्रतिनिधी/ रजत डेकाटे
नागपूर : सध्या शेतकऱ्यांवर आसमानी संकट आले असून यात मानवी हक्कांचे हनन पिक विमा कंपनीकडून होत असून रोगांमुळे व अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून शासनाकडून शेतकऱ्यांना कुठलीही मदत मिळाली नाही. या आशायाखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नागपूर जिल्हा ग्रामीणच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले.
पिकांवर आलेल्या रोगांमुळे व अतिवृष्टीमुळे नागपूर जिल्हय़ातील शेतकरी हवालदिल झाले असून सोयाबीन, कपासी, मिरची, धान, संत्रा, मोसंबी अशा अनेक पिकांचे नुकसान झाल्यास पिक विमा कंपनी अंतर्गत नुकसान भरपाई देण्याची तरतूद होत असते. आणि त्यासाठी शासनाने पुढाकार घेत शेतकऱ्यांचा पिक विमा काढलेला आहे पुढाऱ्यांकडून खोटी आश्वासने देऊन शेतकऱ्यांचे उपोषण ही उधळून लावण्यात आले होते. आदेश ही निघाले होते ते ही कागदापुरतेच समिती गठीत करण्यात आली ते पण नावापुरतीच अखेर शासनाच्या अनागोंदी कारभारामुळे विरोधात माजी मंत्री रमेश बंग, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते सलील देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस नागपूर जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष राजु राऊत, शेतकरी नेते मनोहर वानखेडे, प्रशांत बारेकर,प्रमोद बावणगडे, यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यास सुरुवात केली. घोषणा बाजी व नारे बाजी शेतकऱ्यांचा आक्रोश दिसून येत होता. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी समस्या तातडीने निकाली काढण्याचे आश्वासन दिल्याचे समजते.