गडचिरोली : भामरागड तालुक्यात रस्त्यावर झळकले नक्षल पोस्टर.! - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

Advertise

गडचिरोली : भामरागड तालुक्यात रस्त्यावर झळकले नक्षल पोस्टर.!

दि.२१.०९.२०२३

Vidarbha News India

गडचिरोली : भामरागड तालुक्यात रस्त्यावर झळकले नक्षल पोस्टर.!

विदर्भ न्यूज इंडिया

गडचिरोली/भामरागड : माओवादी संघटनेच्या १९ व्या वर्धापनदिनानिमित्त २१ सप्टेंबरपासून सप्ताहाला सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम दोडराज पोलिस ठाणे हद्दीतील हिंदेवाडा येथे मुख्य रस्त्यावर नक्षल्यांनी पोस्टर झळकावून हिंदुत्वववादी विचारसरणीविरुद्ध जनयुद्धाची हाक दिली.

दरम्यान, पोलिसांनी हे पोस्टर काढले असून तपास सुरु केला आहे.

माओवादी संघटनेच्या १९ वा वर्धापनदिनानिमित्त केंद्रीय समितीने ऑगस्टमध्ये २८ पानांचे पत्रक काढून थेट भाजपला इशारा दिला होता. वर्धापनदिनानिमित्त २१ ते २७ सप्टेंबर २०२३ दरम्यान क्रांतीकारी उत्साहात सप्ताह साजरा करण्याचे आवाहन केले होते. दरम्यान, सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी २१ सप्टेंबरला भामरागड तालुक्यातील हिंदेवाडा फाट्यावरील रस्त्यावर दोन झाडांना नक्षल्यांनी पोस्टर लावले. त्यात संघटनेच्या वर्धापनदिनानिमित्त नक्षल सप्ताह उत्साहात व दृढ संकल्पासह साजरा करण्याचे आवाहन केले आहे.

ब्राम्हणीय हिंदुत्ववादाविरुध्द लढा देण्यासाठी व्यापक जनयुद्धाची हाक दिली आहे. संघटना अधिक मजबूत करण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे. पोस्टरखाली केंद्रीय कमिटी भारत की कम्युनिस्ट पार्टी (माओवादी) असा उल्लेख आहे. दरम्यान, या पोस्टरने परिसरात खळबळ उडाली. माहिती मिळताच पोलिसांनी तेथे धाव घेत पोस्टर ताब्यात घेतले.

धोडराज पोलिस ठाणेद हद्दीतील हिंदेवाडा फाटा रस्त्यावर नक्षल पोस्टर आढळले आहे. ते ताब्यात घेतले असून तपास सुरु केला आहे. नक्षलविरोधी अभियान राबविले जात आहे. त्या भागात पोलिस अधिक अलर्ट आहेत, सी- ६० चे जवान तळ ठोकून आहेत.

- नीलोत्पल, पोलिस अधीक्षक, गडचिरोली

Share News

copylock

Post Top Ad

-->