शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत "पंतप्रधान स्किल रन" चे आयोजन - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

Advertise

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत "पंतप्रधान स्किल रन" चे आयोजन

दि. २२.०९.२०२३
Vidarbha News India
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत "पंतप्रधान स्किल रन" चे आयोजन 
विदर्भ न्यूज इंडिया
नागपूर/हिंगणा :  कौशल्य, रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग महाराष्ट्र राज्य यांचे अधिपत्याखाली व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण सचालनालय मार्फत महाराष्ट्रतील प्रत्येक शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये विश्वकर्मा जयंती निम्मित तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्त्याने PM Skill Run चे दि. १७/०९/२०२३ रोजी आयोजन करण्यात आले होते. या अनुषंगाने औद्योगिक प्रशिक्षण संस्था हिंगणा येथे PM Skill Run चे यशस्वीरीत्या उत्कृष्टरीत्या आयोजित करण्यात आले.
या सपर्धेचा मार्ग हिंगणा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, वानाडोंगरी पासून तहसील कार्यालय हिंगणा पर्यंत होता. स्पर्धेला जवळपास २०० स्थानिक युवक युतींनी सहभाग घेऊन उत्सूर्फ प्रतिसाद दिला. विजेताना प्रथम, द्वितीय, तृतीय पुरस्कार ३०००/-,२०००/-१०००/- रोख रक्कमसह प्रमाणपत्र व मेडल देऊन गौरवण्यात आले.
या स्पर्धेकरीता विविध शासकीय विभागांचा मोलाचा वाटा होता. तहसीलदार प्रियदर्शनी बोरकर नायब तहसीलदार नितीन गोहने यांनी पुढाकार घेऊन जलद गतीने परवानगी मिळवून दिली. तसेच एमआयडीसी पोलिस निरीक्षक यांनी नियोजनपूर्वक बंदोबस्त केले होते. ग्रामीण रुग्णालयातील चमू आणि शालिनीताई मेघे हॉस्पिटलची चमू आणि रुग्णवाहिका सेवा उपलब्ध करून देण्याची व्यवस्था आमदार समीरजी मेघे यांनी केली. मार्गावर ट्रॅफिक पोलीसचे नियंत्रण होते. तर विशेष सहकार्य ज्योतिबा शारीरिक  शिक्षण महाविद्यालय प्राचार्य डॉ. विजय दातारकर, डॉ.मोहन कडवे तालुका हिंगणा क्रीडा संकुल क्रीडा मार्गदर्शक सतीश भालेराव यांनी टेक्निकल ऑफिशियल उपलब्ध करुन स्पर्धा नियोजन पद्धतीने व शिस्तबद्ध पद्धतीने आयोजित करून यशस्वी पार पाडली. खेळाडू करिता  पाण्याची सोय, नाश्ता, एनर्जी ड्रिंक्सची व्यवस्था करण्यात आली होती.
या स्पर्धेचा मुख्य उद्देश सर्वसामान्य जनतेला "कौशल्य युक्त रोजगार भिमुख" अभ्यासक्रमाबद्दल अवगत करणे होते, असे संस्थेचे प्राचार्य डॉ. अजय बेझलवार यांनी नमुद केले. या स्पर्धेकरीता संस्थेतील सर्व कर्मचार्यांनी अतिशय नियोजन पद्धतीने आणि शिस्तबद्ध पद्धतीने तयारी करून मोलाचा सहकार्य केले.

Share News

copylock

Post Top Ad

-->