दि. १ ऑक्टोंबर २०२३
सेवा पंधरवडा निमित्त मुरखळा (माल) येथे स्वच्छता अभियान ... विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली/चामोर्शी : स्वच्छ भारत मिशन अंतर्गत 'स्वच्छता हि सेवा' १ तास माझ्या गावाच्या स्वच्छतेसाठी हा उपक्रम ग्रामपंचायत मुरखळा (माल) तथा जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मुरखळा (माल) यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक १/१०/२०२३ रोज रविवार ला मुरखळा (माल)ग्रामपंचायत चे सन्माननीय सरपंच श्री भास्कर भाऊ बुरे, ग्रामविस्तार अधिकारी श्री यादव मुळे साहेब, ग्रामपंचायत सदस्य श्रीमती अर्चना कालिदास नैताम, श्रीमती कल्पना विजय कन्नाके,जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मुरखळा (माल) चे मुख्याध्यापक श्री गणेश बोईनवार सर, पदवीधर शिक्षक श्री रघुनाथ भांडेकर सर, सहायक शिक्षक श्री अशोक जुवारे सर, अंगणवाडी शिक्षिका श्रीमती राऊत मॅडम, श्रीमती बुरे मॅडम, श्रीमती गेडाम मॅडम, संगणक परिचालक श्रीमती सुषमा गेडाम,उमेदच्या कार्यकर्त्या श्रीमती कुसुमबाई सुनिल धोडरे, श्रीमती इंदुबाई मोरेश्वर पवार,प्रतिष्ठित नागरिक श्री यादव बुरे,श्री शामराव निशाणे,श्री माणिक घोगरे,श्री सचिन तुंबडे,श्री राकेश नैताम तसेच शाळेतील विद्यार्थी व गावातील नागरिक यांचे प्रमुख उपस्थितीत राबविण्यात आला.