दि. १४ ऑक्टोंबर २०२३
Vidarbha News India
टॅबमुळे साधणार विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती...
Educational progress
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : इतर मार्गास वर्गातील नीट, जेईई, एमएचटी-सीईटी यांचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) नागपूरच्या वतीने मोफत टॅब नेटचे वितरण करण्यात आले.
या टॅबमुळे विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती अधिक गतीने साध्य होण्यास मदत मिळणार आहे.
सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, सामाजिक न्याय भवन गडचिरोली येथे मोफत टॅब व नेट वितरणाचा कार्यक्रम पार पडला. जिल्ह्यातील 100 विद्यार्थी सदर योजनेस पात्र झाले होते. या विद्यार्थ्यांना टॅब, सिम कार्डसह, हेडफोन वितरीत करण्यात आले. सदर साहित्याचे वितरण जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त देवसुदन धारगावे, समाजकल्याण सहाय्यक आयुक्त डॉ. सचिन मडावी यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले. Educational progress यावेळी उपस्थित मान्यवरांनी सदर साहित्याचा उपयाग केवळ शिक्षणासाठी करुन शैक्षणिक प्रगती साधण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाला राहुल गोंविदवार सकनी, रुपाली अपराजीत, अजय पत्रे, आशिष नंदनवार व बार्टी प्रकल्प अधिकारी मनिष गणवीर यांचेसह पात्र विद्यार्थी व पालक उपस्थित होते.