दि. २४.१०.२०२३
गोटूल भूमी चांदाळा, गडचिरोली येथे (दसरा) विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर खासदार अशोक नेते यांच्या नेतृत्वात आदिवासी देवी देवतांची महापुजा संपन्न.
- सरसेनापती विद्यार्थी संघ नंदू भाऊ नरोटे यांच्या विदयार्थ्यांनसाठी स्पर्धा परीक्षेच्या पुस्तकाचे प्रकाशन खासदार अशोक नेते व आमदार डॉ. देवराव होळी यांच्या हस्ते करण्यात आले.
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : जिल्हातील गोटूल समिती तर्फे गोटूल भूमी चांदाळा रोड,गडचिरोली येथे आज दसरा विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर आदिवासी देवी देवतांची महापुजा खासदार अशोक नेते यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
याप्रसंगी नंदू भाऊ नरोटे सरसेनापती विद्यार्थी संघ यांच्या विदयार्थ्यांनसाठी स्पर्धा परीक्षेच्या पुस्तकाचे प्रकाशन खासदार अशोक नेते व आमदार डॉ. देवराव होळी यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाप्रसंगी खासदार अशोकजी नेते यांनी बोलतांना विद्यार्थ्यांनी जीवनामध्ये तीन गोष्टी अवलंबिले पाहिजे. या तिन गोष्टी अवलंबिले तर आपले जीवन सुखमय व सार्थक आहे. एक तोंडात साखर, डोक्यावर बर्फ, पायात चक्री, दूरदृष्टी,सहनशीलता,(लगन) एकाग्रता जसे एखाद्याने कोणी आपणांस काही म्हटलं तरी मुकाट्याने भांडण तंटा न करता शांत राहून सहनशीलता बाळगावी. विद्यार्थ्याने शिकण्याची जिद्द चिकाटी, आवड, ठेवले पाहिजे मग कोणताही क्षेत्र असो दूरदृष्टीचा विचार केला पाहिजे, कुणी काहीही म्हणो आपलं काम चांगले विचार, चांगले आचार आत्मसात करून आपले काम प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न करावा. यामुळे यश आपल्याला निश्चित मिळेल. असे प्रतिपादन खासदार अशोकजी नेते यांनी याप्रसंगी केले.
पुढे बोलतांना खासदार महोदयांनी माणसाचे सारासार विचाराने, चांगल्या-वाईटाच्या नजरेने त्या विचारांकडे बघितले, तर काही विचार चांगले, सकारात्मक प्रगतीशीलतेकडे नेणारे, आनंद निर्माण करणारे आणि जीवन समृद्ध करणारे विचार असतात. तर काही विचार नकारात्मक, नैराश्य निर्माण करणारे असतात.आदिवासी देवी देवतांच्या महापूजा प्रसंगी चांगले आचार,चांगले विचार, आत्मसात केले पाहिजे,क्षेत्र कोणताही असो प्रत्येक क्षेत्रात प्रगती करून आई-वडिलांचा मान राखून कार्य केले पाहिजे. या आदिवासी देवी देवतांच्या महापूजे प्रसंगी आशीर्वाद रूपी प्रदान करत जनतेला सुख - समृद्ध, आरोग्य संपन्न,जीवन लाभो अशा शुभेच्छा देत (दसरा) विजयादशमीच्या ही समस्त जनतेला यावेळी शुभेच्छा दिल्या.
यावेळी खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु. अशोक नेते, आमदार डॉ. देवराव होळी, सरसेनापती आदिवासी विद्यार्थी संघ मा.नंदू नरोटे,मोहन पुराम,डॉ. साईनाथ कोडापे, किसन मडावी, प्रभाकर येरणे सर,मनिषा नरोटे, माया मडावी,शक्ती भाऊ साहेब, अनिल कुनघाडकर,वसंत कुलसंगे तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.