११ लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षलवादी रजनीचे गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

Advertise

११ लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षलवादी रजनीचे गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण

दि. ७ आक्टोंबर २०२३ 

Vidarbha News India 

११ लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षलवादी रजनीचे गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण

विदर्भ न्यूज इंडिया 

गडचिरोली : नक्षल दलममध्ये सदस्य ते एरिया कमिटी मेंबर अशी मजल मारलेल्या छत्तीसगडमधील महिला नक्षलवाद्याने ६ ऑक्टोबरला गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. रजनी उर्फ कलावती समय्या वेलादी (२८,रा.ईरूपगट्टा ता.भोपालपट्टनम जि.बिजापूर, छत्तीसगड) असे तिचे नाव आहे.

सरपंचाच्या खुनासह पोलिसांसोबतच्या चार चकमकींमध्ये सहभागी असलेल्या रजनीवर ११ लाखांचे बक्षीस होते.

रजनी वेलादी ही ऑगस्ट २००९ मध्ये फरसेगड दलममध्ये सदस्य म्हणून नक्षली चळवळीत सामील झाली. २०१० पर्यंत ती सक्रिय होती. २०१० मध्ये ओरच्छा दलममध्ये बदली होऊन २०१३ पर्यंत ती कार्यरत राहिली. २०१३ मध्ये नॅशनल पार्क एरिया डॉक्टर टीममध्ये बदली होऊन तिची एरिया कमिटी मेंबर म्हणून पदोन्नती झाली. २०१५ पर्यंत ती कार्यरत होती. त्यानंतर तिची सांड्रा दलममध्ये बदली झाली व तेव्हापासून ती या दलममध्येच कार्यरत आहे.

२०२०- २१ मध्ये उपराल (छत्तीसगड) येथील एका निरपराध सरपंचाच्या खुनात तिचा प्रत्यक्ष सहभाग होता. याशिवाय २०१५ मध्ये गुंडम येथील पोलिस चकमकीत ती सहभागी होती. २०१७ मध्ये बेज्जी- येर्रागुफा मार्गावरीील चकमकीत छत्तीसगडचे १२ जवान शहीद झाले होते. यात देखील ती सहभागी होती. २०१८ मध्ये मारेवाडा व २०१९ मध्ये बोरामज्जी जंगलातील चकमकीतही रजनी वेलादीचा सहभाग होता.२०१८ मध्ये बेद्रे रोडवर शासकीय वाहन पेटवून दिले होते, यामध्येही ती सामील होती. दरम्यान, तिच्यावर छत्तीसगड सरकारने ६ तर महाराष्ट्र शासनाने ५ लाखांचे बक्षीस जाहीर केले होते.

पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी ७ ऑक्टोबरला पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. यावेळी अपर अधीक्षक अनुज तारे, कुमार चिंता, यतीश देशमुख उपस्थित होते. यावेळी आत्मसमर्पण करुन सामान्य जीवन जगण्याचा निर्णय घेतल्याबद्दल रजनी वेलादीचा सत्कार करण्यात आला.

साडेचार लाखांचे बक्षीस, भूखंडही मिळणार

दरम्यान, नक्षल्यांसाठी २०१४ मध्ये महाराष्ट्र शासनाने आत्मसमर्पण योजना लागू केली. यांतर्गत रजनी वेलादीला पुनर्वसनाकरता केंद्र व राज्य सरकारकडून एकूण साडेचार लाख रुपये दिले जाणार आहेत. याशिवाय नवेगाव परिसरात भूखंड दिला जाणार असून रोजगार देखील मिळवून दिला जाणार आहे.

आतापर्यंत १३ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

जिल्ह्यात मागील पावणे दोन वर्षांत १३ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले, अशी माहिती पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी दिली. नक्षल चळवळ खिळखिळी झाली असून तेथे जबरदस्तीने पैसे वसुलीची कामे करुन घेतली जातात, विवाहित जोडप्यांना स्वतंत्र वैवाहिक आयुष्य जगता येत नाही. नक्षलविरोधी अभियानामुळे जंगलात जीव धोक्यात घालून वावरावे लागते. त्यामुळे अनेक जण आत्मसमर्पणाचा मार्ग स्वीकारत असल्याचे पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी सांगितले.


Share News

copylock

Post Top Ad

-->