दि. १३ ऑक्टोंबर २०२३
आ. डॉ. देवरावजी होळी यांच्या नेतृत्वात भेंडाळा जवळ रास्ता रोको आंदोलन.!
- रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी दिला होता आंदोलनाचा इशारा
- दिनांक १४ ऑक्टोंबर ला भेंडाळा येथील बस स्टँड रोडवर करणार चक्काजाम
- नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन...
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली/चामोर्शी : हरणघाट- चामोर्शी रस्त्यावरील खड्डे बुजवण्यात यावे यासाठी आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी प्रशासनाला शुक्रवार पर्यंतचा वेळ दिलेला होता परंतु अजूनही रस्त्यावरील खड्डे बुजवण्यात न आल्याने उद्या दिनांक १४ ऑक्टोंबर २०२३ रोजी भेंडाळा जवळील बस स्टँड जवळ सकाळी ११ वाजता रास्ता रोको आंदोलन करण्यात येत असल्याची माहिती आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी या प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून दिलेली आहे.
या रास्ता रोको आंदोलनात परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहनही त्यांनी जनतेला केले आहे.