दि. 30.10.2023
जनतेने विश्वकर्मा योजनेचा लाभ घ्यावा;-भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे यांचे आवाहन
कार्यक्रम मुरखळा माल येथे आयोजन...
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली/चामोर्शी : देशाचे लाडके पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी जी यांच्या 106 व्या मन की बात विश्वकर्मा के साथ या कार्यक्रमाचे आयोजन भाजपा ओबीसी मोर्चा वतीने मुळखला माल येथे करण्यात आले.
या कार्यक्रमाला उपस्थित भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे,ओबीसी मोर्चाचे प्रदेश सचिव अर्चनाताई डेहलकर, भाजपा ओबीसी मोर्चा चे जिल्हाध्यक्ष अनिलजी पोहनकर,
जिल्हा महामंत्री तथा सरपंच भास्कर जी बुरे,जिल्हा उपाध्यक्ष स्वप्नील वरघंटे,उपसरपंच लक्ष्मिताई सालोरकर,राजू झाडे,योगराज बुरे, रेवनाथ कुसराम,श्रीकांत पतरंगे,अर्चना नैताम,ज्येष्ठ नागरिक भाऊजी बुरे,सचिन भोयर, अरुण बुरे जयश्री बटे,मारोती बोधलकर,सुभाष बुरे, पत्रुजी शेंडे, व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे यांनी स्थानिक नागरिकांना संबोधित करतांना पंतप्रधान विश्वकर्मा कौशल्य योजने बदल ची माहिती सांगितले.
विश्वकर्मा योजनेची घोषणा केंद्रीय अर्थसंकल्प 2023-24 मध्ये करण्यात आली. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी स्वातंत्र्यदिना निमित्त लाल किल्ल्यावरून हे योजना लवकरच लाँच करण्याचे आश्वासन दिले होते.
विश्वकर्मा योजनेअंतर्गत सरकार 13,000 कोटी रुपये खर्च करणार असून. याद्वारे पारंपारिक कौशल्य असलेल्या लोकांना मदत मिळेल योजनेच्या माध्यमातून सोनार,लोहार, नाई आणि मोची यांसारखी पारंपरिक कौशल्ये असलेल्या लोकांना अनेक प्रकारे लाभ मिळणार आहेत.
या योजने अंतर्गत 3 लाख पर्यंत कर्ज मिळणार असून पहिल्या टप्प्यात 1 लाख रुपयां पर्यंत आणि दुसऱ्या टप्प्यात 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाईल आणि तेही केवळ 5 टक्के सवलतीच्या व्याजदरात. याशिवाय उत्पादने आणि कारागीर
यांच्या सेवांचा विश्वकर्मा योजनेत समावेश केला जाईल.
सरकारने या योजनेत 18 पारंपारिक कौशल्य व्यवसायांचा समावेश केला आहे, ज्यामुळे संपूर्ण भारतातील ग्रामीण आणि शहरी भागातील कारागीरांना मदत होईल. यामध्ये सुतार, होडी बनवणारे कामगार, लोहार, कुलूप बनवणारे कारागीर, सोनार, मातीची भांडी आणि इतर वस्तू बनवणारे कुंभार, शिल्पकार, गवंडी, माशांचे जाळे बनवणारे, खेळणी बनवणारे आणि इतरांचा समावेश आहेत.
पंतप्रधान विश्वकर्मा योजनेअंतर्गत येणाऱ्या सर्व लाभार्थ्यांनी योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रस्तावना भास्करजी बुरे व सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शेषरावजी कोहळे यांनी केले.