सौ.योगिताताई पिपरे यांची महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा नागपूर विभाग महिला आघाडी उपाध्यक्षपदी निवड ! - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

Advertise

सौ.योगिताताई पिपरे यांची महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा नागपूर विभाग महिला आघाडी उपाध्यक्षपदी निवड !

दि. 30.10.2023 
Vidarbha News India 
सौ.योगिताताई पिपरे यांची महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा नागपूर विभाग महिला आघाडी उपाध्यक्षपदी निवड !
विदर्भ न्यूज इंडिया 
गडचिरोली : महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा विभागीय बैठक नागपूर येथील जवाहर विद्यार्थी सभागृह येथे दिनांक 28 ऑक्टोबर 2023  रोजी पार पडली. यावेळी सौ.योगिताताई पिपरे यांची महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा नागपूर विभाग महिला आघाडी संघटनेच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
गडचिरोली जिल्ह्यात समाजासाठी चांगले कार्य केल्याबद्दल समाजातील एक क्रियाशील कार्यकर्ते व समाजकार्यात मोलाचे योगदान असल्यामुळे,महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे अध्यक्ष खासदार मा.रामदासजी तडस,महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे महासचिव मा.डॉ.भूषणजी कर्डिले,महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे सहसचिव मा. बळवंतराव मोरघडे,महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे नागपूर विभागीय अध्यक्ष मा.जगदीश वैद्य,महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा महिला आघाडीचे विदर्भ संघटक सौ. माधुरीताई तलमले यांच्या हस्ते उपाध्यक्षपदी निवड झाल्याचे नियुक्तीपत्र देऊन संघटनेची जबाबदारी सोपविण्यात आली.
याप्रसंगी कार्याध्यक्ष मा. अशोक व्यवहारे,उपाध्यक्ष मा. हिरालाल चौधरी,कोषाध्यक्ष मा. गजानन शेलार,सहसचिव मा.संजीव शेलार,युवा आघाडी प्रदेश अध्यक्ष आमदार मा. संदीप क्षीरसागर,युवा आघाडी प्रदेश कार्याध्यक्ष मा.अतुल वांदिले,गडचिरोली जिल्हाध्यक्ष मा.इंजि.प्रमोदजी पिपरे तसेच महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे पदाधिकारी,सभासद व समाज बांधव उपस्थित होते.
सौ.योगिताताई पिपरे यांची महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा नागपूर विभाग महिला आघाडी उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांनी व समाज बांधवांनी शुभेच्छा देऊन अभिनंदन केले.

Share News

copylock

Post Top Ad

-->