दि. ४ ऑक्टोंबर २०२३
Vidarbha News India
गडचिरोली : देसाईगंजमधील दोन विद्यार्थिनी शाळेतून बेपत्ता.!
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : देसाईगंज शहरातील आदर्श न्यू इंग्लिश हायस्कूलच्या दोन अल्पवयीन विद्यार्थिनी मंगळवारपासून (दि. ३) शाळेतून अचानक गायब झाल्याने खळबळ माजली आहे.
कांचन वंजारी व रेशमा धोटे अशी बेपत्ता विद्यार्थिंनीची नावे आहेत.
दोन्ही विद्यार्थिनी भगतसिंह वॉर्डातील रहिवासी असून त्या दोघी शेजारीच राहतात. त्या अचानक गायब झाल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली असून देसाईगंज पोलिस तपास करीत आहेत.