दि. 24.11.2023
Vidarbha News India
मैदानी खेळाने स्वास्थ शारिरीक व्यायाम व गावाचा विकास साधावा; भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे
- भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे यांचे प्रतिपादन
- भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे यांच्या हस्ते शिव स्वराज्य युवक क्रिडा मंडळ चांभार्डा च्या वतीने आयोजित भव्य ग्रामीण कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : तालुक्यातील मौजा- चाभार्डा येथे शिव स्वराज्य युवक क्रिडा मंडळ चांभार्डा च्या वतीने भव्य ग्रामीण कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या उद्घाटना प्रसंगी जिल्हाध्यक्ष प्रशांत जी वाघरे यांनी बोलतांना, कबड्डी खेळ मैदानी खेळ असुन सांघिक खेळ म्हणून खेळला जातो. खेळ ही एक शारीरिक व मानसिक कला आहे. खेळ खेळल्यामुळे शारीरिक विकास व गावाचा विकास साधतो त्याबरोबर मानसिकताही प्रबळ बनते. तसेच मुलींनी, युवकांनी मैदानी खेळ व वाचन करावे. युवकांनी अशा मैदानी कार्यक्रमात सहभागी होऊन आपल्या कला गुणांना वाव देऊन मैदानी खेळ खेळावे. मैदानी खेळ खेळल्याने शरीर सुदृढ, स्वास्थ व शारिरीक व्यायाम होतो. व मैदानी खेळाच्या माध्यमातून गावाचा विकास साधावा असे या प्रतिपादन जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे यांनी केले.
ग्रामीण भागातील कारागिरांनी केंद्र सरकार च्या विश्वकर्मा योजनेचा लाभ घ्यावा या योजनेअंतर्गत 18 पारंपारिक कौशल्य व्यवसायांचा समावेश केला आहे, ज्यामुळे संपूर्ण भारतातील ग्रामीण आणि शहरी भागातील कारागीरांना मदत होईल. यामध्ये सुतार, होडी बनवणारे कामगार, लोहार, कुलूप बनवणारे कारागीर, सोनार, मातीची भांडी आणि इतर वस्तू बनवणारे कुंभार, शिल्पकार, गवंडी, माशांचे जाळे बनवणारे, खेळणी बनवणारे आणि इतरांचा समावेश आहेत.
पंतप्रधान विश्वकर्मा योजनेअंतर्गत येणाऱ्या सर्व लाभार्थ्यांनी योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे यांनी केले.
त्याप्रसंगी मंचावर अरविंदजी कात्रटवार - शिवसेना (उ.बा ठा.) सहसंपर्क प्रमुख मा. कुणाल चिलोलवार गडविरोली तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस, जि.प.प्राथमिक शाळा चे शिक्षक वृंद मा. पोटावी सर मा. श्रीरामे सर, मा.मडावी सर, सौ. व्हि.एम. इंचोडकर मॅडम मा. यादवजी लोहबरे शिवसेना (उ.बा.ठा) तालुका प्रमुख गडचिरोली, मा. दुधरामजी चनेकार , पुरुषात्तमजी चवेकार, मा. विलास ठाकरे,दिगांबर गोहणे,दिलीप चिकराम,जगदीश बावने,उमाजी चनेकारा. सुरेश कोलले,लोमेश कुमरे, सौ. अर्चना लड़के, प्रतिक मसराय, मयुर भोयर, पंकज चनेकार, गौरव पाल, खुशाल मेश्राम, महेश लानुरकार, धनंजय चापले,चेतन चिकराम, सुरज चिकराम व खेळाडू,ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.