दि. 27.11.2023
गडचिरोली : धर्मरावबाबा आत्राम जनसाहाय्यता कार्यालयाचे उद्घाटन.!
- माजी जि.प.अध्यक्षा तथा सिनेट सदस्या मा. भाग्यश्रीताई आत्राम यांच्या हस्ते उदघाटन.!
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : दि.26 नोव्हेंबर 2023 ला गडचिरोली येथे गणेश नगर कॉलनी,अनंत हॉस्पिटल जवळ, मा.ना.धर्मरावबाबा आत्राम यांच्या जनसाहाय्यता कार्यालयाचे उदघाटन माजी जि.प.अध्यक्षा तथा सिनेट सदस्या मा.भाग्यश्रीताई आत्राम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सिनेट सदस्या तनुश्रीताई आत्राम व परिसरातील नागरिक उपस्थित होते. या कार्यालयाचा उद्देश असा आहे कि दुर्गम भागातील लोकांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविणे व सर्व नागरिकांपर्यंत नव-नवीन योजना पोहोचविणे हा आहे असे तनुश्रीताई आत्राम म्हणाल्या...
धर्मरावबाबा आत्राम जनसाहाय्यता कार्यालय
जर आपल्याला कोणत्याही प्रकारच्या आॕफिशीयल कामाकरीता मदतीची गरज असेल तर संपर्क साधा.
ऑफिस पत्ता - अनंत हॉस्पिटल जवळ,स्वामी विवेकानंद ज्यु. सायन्स कॉलेजच्या मागे,गणेश नगर कॉलनी,गडचिरोली.