दि. ३ नोव्हेंबर २०२३
बंगाली भाषिक शिक्षण सेवकाची पदे तातडीनं खुल्या प्रवर्गातून भरा; आमदार डॉ. देवरावजी होळी
- आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी घेतली शिक्षण सचिवांची मंत्रालयात भेट
- २००९ पासून ४६ बंगाली माध्यमांच्या प्राथमिक शाळेतील शिक्षण सेवकांची पदे रिक्त
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : गडचिरोली जिल्हा परिषदेतील ४६ बंगाली माध्यमांच्या प्राथमिक शाळांमधील शिक्षण सेवकांची पदे २००९ पासून रिक्त असून सदर पदे भरण्यासंदर्भात प्रचंड विलंब होत आहे. यामुळे बंगाली भाषिक विद्यार्थ्यांचे फार मोठे नुकसान होत असून या संदर्भात तातडीने निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. करिता आपण विशेष बाब म्हणून बंगाली भाषिक माध्यमांचे प्राथमिक शाळेतील शिक्षक सेवकांची रिक्त पदे खुल्या प्रवर्गातून भरती करावी अशी मागणी आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी शिक्षण विभागाचे सचिव यांची मुंबई मंत्रालय येथे भेट घेऊन पत्राच्या माध्यमातून केली.
जिल्हा परिषद प्रशासनाने बंगाली माध्यम भाषिक अल्पसंख्यांक आहेत. त्यामूळे बंगाली आरक्षण लागू होत नाही करिता बंगाली माध्यमांची शाळा प्रमाणे शिक्षक संख्या अद्यावत करून दिनांक ५ मार्च २०२३ च्या जाहिरातीप्रमाणे रिक्त असलेल्या जागा भरण्याचे अधिकार आपणाकडे असल्याने सदर पदे संदर्भात तातडीने कारवाई करून रिक्त पदे भरावी व बंगाली समाजावरील अन्याय दूर करावा अशी मागणी आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी यावेळी केली.