दि. १८.११.२०२३
Vidarbha News India
अनुसूचित जाती प्रवर्गातील उद्योजकांकरिता निवासी प्रशिक्षण
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : जिल्ह्यातील अनुसूचित जातीच्या उद्योजकांकरीता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विशेष सामूहिक प्रोत्साहन योजनेंतर्गत निवासी उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. १८ दिवस कालावधीच्या या कार्यक्रमात विविध उद्योगसंधी, व्यक्तिमत्व विकास, शासकीय योजनांची माहिती, प्रकल्प अहवाल तयार करणे, हिशेव ठेवणे, उद्योगाचे व्यवस्थापन, कर्जप्रकरण तयार करणे, यशस्वी उद्योजकांची चर्चा, उद्योगांना भेटी आदी विषयांवर तज्ज्ञ व अधिकारी वर्गाद्वारे मार्गदर्शन करण्यात येईल. हे प्रशिक्षण निशुल्क व निवासी स्वरुपाचे आहे.
१८ ते ४० वयोगटातील १०वी पास/ नापास अनुसूचित जातीचे प्रशिक्षणार्थी यामध्ये भाग घेवु शकतात. या कार्यक्रमाच्या माहितीकरीता २० नोव्हेंबर रोजी गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथे उद्योजकता जागृती मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे. प्रवेश अर्ज व अधिक माहितीकरीता प्रकल्प अधिकारी मिटकॉन गडचिरोली, देविचंद मेश्राम जिल्हा उद्योग केंद्र, कॉम्पलेक्स, गडचिरोली येथे संपर्क करावा, असे आवाहन महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र गडचिरोली यांनी केले आहे.