दि. ६ नोव्हेंबर २०२३
गडचिरोली विधानसभा भाजपा बूथ पालकांचा ७ नोव्हेंबर रोजी चामोर्शी येथे मेळावा; आमदार होळी यांचे आवाहन
- आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांचे बुथ पालकांना उपस्थित राहण्याचे आवाहन
- चामोर्शी येथील तेली समाजाच्या सभागृहामध्ये दुपारी १ वाजता बूथ पालक मेळाव्याचे आयोजन
- जिल्हा प्रभारी बाळाभाऊ अंजनकर यांचे सह आमदार, खासदार जिल्हाध्यक्ष जिल्हा महामंत्र्यांचे मार्गदर्शन
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : भारतीय जनता पार्टी गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील बूथ पालकांचा मेळावा दिनांक ७ नोव्हेंबर २०२३ रोजी चामोर्शी येथील तेली समाजाच्या सभागृहामध्ये दुपारी १ वाजता होणार असून या मेळाव्याला बूथ पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी केले आहे.
या मेळाव्याला भारतीय जनता पार्टीचे गडचिरोली जिल्ह्याचे प्रभारी बाळाभाऊ अंजनकर, खासदार अशोकजी नेते, आमदार डॉ. देवरावजी होळी, भाजपा जिल्हा अध्यक्ष प्रशांतजी वाघरे, लोकसभा संयोजक किसनजी नागदेवे, लोकसभा समन्वयक प्रमोदजी पिपरे, यांचे सह जिल्ह्याचे महामंत्री मार्गदर्शन करणार आहेत.