गोंडवाना विद्यापीठात अधिसभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न.! - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

Advertise

गोंडवाना विद्यापीठात अधिसभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न.!

दि. 23.11.2023
Vidarbha News India 
गोंडवाना विद्यापीठात अधिसभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न.!
विदर्भ न्यूज इंडिया 
प्रतिनिधी/गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठाची दिनांक ९ जानेवारी २०२३ ला सुरू झालेली अधिसभा कामकाज पूर्ण न झाल्याने तहकुब करण्यात आली होती. त्यानंतर दिनांक २० नोव्हेंबर २०२३ रोजी अधिसभेला सुरवात करण्यात आली.असे दोन दिवस ही अधिसभा चालली.
या अधीसभेच्या पहिल्या दिवशी सुरुवातीला गोंडवाना विद्यापीठाच्या परिक्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्व अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचा राज्यमंत्रीमंडळात समावेश झाल्यासाठी तसेच विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांची महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा विरोधीपक्ष नेतेपदी निवड झाली. ही बाब गडचिरोली जिल्हासाठी अभिमानाची असल्याने तसेच रासेयो विभागीय समनव्यक पवन नाईक, स्वयंसेविका जानव्ही पेद्दीवार,गोंडवाना विद्यापीठाचे रासेयो संचालक डॉ. श्याम खंडारे  यांचे  मिळालेल्या राष्ट्रीय पुरस्काराबाबत अभिनंदनचा प्रस्ताव मांडण्यात आला. हा प्रस्ताव सर्वानुमते पारीत करण्यात आला. प्राचार्य गटातून रिक्त असलेल्या जागेवर राजशे दहेगावकर, आंबेडकर कला, वाणिज्य व महाविद्यालय, चंद्रपूर  यांची तर  कुलपती नामीत सदस्य म्हणून  प्रा. योगेश येनारकर, यांची अधिसभेवर  नामनिर्देशन करण्यात आले.
यानंतर १२मार्च व १४ मार्च २०२३रोजीच्या अधीसभेचे इतिवृत्तवाचून कायम करण्यात आले तसेच १७ जानेवारी २०२३रोजीच्या अधिसभेच्या  कार्यवृत्तावर घेतलेल्या कार्यवाहीची नोंद घेण्यात आली. पुढे  प्रश्नोत्तरांच्या तासाला सुरवात झाल्यानंतर ही अधिसभा कामकाज पूर्ण न झाल्याने तहकुब करण्यात आली.
त्यानंतर २०नोव्हेंबर रोजी अधिसभा ला सुरवात झाली. अध्यापकांच्या मानधनाचे देयके प्रलंबित असल्याबाबत तसेच ओसी देण्यात बाबतचा प्रश्न होता यावर तात्काळ  कुलगुरु डॉ. प्रशांत बोकारे यांच्या निर्देशानुसार परिपत्रक निर्गमित करण्यात आले. गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली अंतर्गत येणाऱ्या सर्व संशोधन केंद्रामध्ये  मानताप्राप्त  पी. एच. डी. सुपरवायझर(गाईड ) परंतू त्यांच्या महाविद्यालयामध्ये संशोधन केंद्र नसणाऱ्या संशोधक प्राध्यापकांना दुसऱ्या महाविद्यालयात संशोधन केंद्र असणाऱ्या संशोधन केंद्र इम्पानलमेंट ऑफ द रिसर्च सुपरवायझर मध्ये समाविष्ट करून  पी. एच. डी. सुपरवायझर  म्हणून काम करण्यासाठी मंजूरी देण्याबाबतचा प्रस्ताव होता सदर प्रस्ताव सर्वानुमते समंत करून विद्यापरिषदेकडे वर्ग करण्यात आला. संतश्रेष्ठ श्री. संत शिरोमणी नरहरी महाराज यांच्या ऐक्याचा सिध्दांत गोंडवाना विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समाविष्ठ करण्याबाबतचा  प्रस्ताव सर्वानुमते पारित झाला. सदर प्रस्ताव मराठी अभ्यासमंडळाकडे वर्ग करण्यात आला. 
गोंडवाना विद्यापीठाचे कार्यक्षेत्र लक्षात घेता भौगोलीक सपदांनी नटलेले हे क्षेत्र नैसर्गीक साधनसंपत्तीने ओतप्रोत भरलेले आहे. चंद्रपूर व गडचिरोली या दोन जिल्हयाला लाभलेल्या भौगोलिक स्थितीचे अभ्यासपूर्ण नियोजन केल्यास पर्यटन, उदयोग, शेती या क्षेत्रात मोठया प्रमाणात रोजगार निर्माण होवू शकते. त्यासाठी गोंडवाना विद्यापीठ येथे भूगोल विभाग सुरू करून भूगोलाचे शास्त्रीय अध्ययन व संधोशन करण्याची संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यासाठी हा प्रस्ताव होता. सदर प्रस्तावाबाबत कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांनी होकार दर्शवत सदर प्रस्ताव  शासनाकडे प्रलंबित आहे. असे सांगितले. 
शारिरीक शिक्षण हा विषय बी.ए., बी.कॉम व बी.एस.सी. मध्ये अंतर्भाव करण्याबाबतचा प्रस्ताव होता. सदर प्रस्ताव कुलगुरू महोदयांनी मान्य करत सर्वानुमते पारित करण्यात आला. 
गोंडवाना विद्यापीठाच्या नविन प्रस्तावित परिसरात २ ते ३ एकरात आकर्षक "आदिवासी सृष्टी" निर्माण करण्यात यावी. या भागात आदिवासी संस्कृतीची छाप आहे. आदिवासी सण, भाषा, पहेराव, खाद्यान्न तसेच आदिवासी संस्कृतीचे प्रतिबिंब असावे. या सृष्टीमध्ये आदिवासी संस्कृतीशी संबंधित विविध वस्तूंचे संग्रहालय  निर्माण करण्यात यावे असा प्रस्ताव होता. सदर प्रस्ताव कुलगुरू महोदयांनी मान्य करत सर्वानुमते पारित झाला यावर ते म्हणाले, सदर प्रस्तावाच्या  बाबत एक समिती गठीत करण्यात येईल. त्यात स्थानिक तज्ञ अभ्यासकांचा समावेश राहील.
मृत कर्मचाऱ्यांच्या वारसास तातडीने अस्थाई स्वरूपात कर्मचारी म्हणून नियुक्त करण्याबाबत तसेच सानुग्रह निधीच्या रक्कमेत वाढ करण्याबाबत अधिसभेपुढे प्रस्ताव ठेवण्यात आला होता. सदर प्रस्ताव मंजूर करून व्यवस्थापन परिषदेकडे वर्ग करण्यात आला. 
गोंडवाना विद्यापीठ येथे वनस्पतीशास्त्र, प्राणिशास्त्र जैवतंत्रज्ञान, सुष्मजीवशास्त्र, जीवरसायनशास्त्र विभाग सुरू करून  अध्ययन व संशोधन करण्याची संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यासाठीचा  प्रस्ताव होता. 
या आशयाचा प्रस्ताव या पूर्वीच शासनाकडे पाठविण्यात आला आलाय . त्यांच्या कडून मंजूर झाल्यास त्याची अंमलबजावणी करण्यात येईल . असे कुलगुरू महोदयांनी सांगितले.  
२६ नोव्हेंबर २०२३ ला भारतीय संविधान लागू झाल्याला ७४ वर्ष पूर्ण होऊन ७५ व्या वर्षात म्हणजेच अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण होत आहे. विद्यापीठाच्या  विद्यार्थ्यांमध्ये संविधानिक नीतिमत्ता निर्माण करणे हे विद्यापीठाचे उद्दिष्ट असल्याचे विद्यापीठ कायद्यात नमूद आहे. म्हणून विद्यापीठाच्या नव्याने निर्माण होणाऱ्या शैक्षणिक परिसराच्या  किंवा विद्यापीठाच्या दर्शनी भागात भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचा शिलालेख उभारल्यास संविधाना प्रती कृतज्ञता व्यक्त करता येईल व संविधानातील नितीमत्ता निर्माण करण्याच्या विद्यापीठाच्या उद्दिष्टाची पूर्तता करता येईल. शिवाय विद्यापीठाने संविधान सन्मान महोत्सवाचे आयोजन करून त्याद्वारे विविध कार्यक्रमाचे आयोजन करावे तसेच विद्यापीठाशी संलग्नित सर्व महाविद्यालयांमध्ये संविधान सन्मान महोत्सवाचे आयोजन करण्याच्या सूचना द्याव्या व संविधान सन्मान महोत्सव साजरा केल्याचे महाविद्यालयाकडून अहवाल प्राप्त करून घ्यावा. या बाबत  प्रस्ताव एक मताने पारित होऊन  बाबासाहेब अध्यासन केंद्राच्या माध्यमातून हा उपक्रम राबवण्यात येईल तसेच  विद्यापीठाच्या नवीन कॅम्पस मध्ये भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचा शिलालेख उभारण्यात येईल असे कुलगुरू महोदय म्हणाले .
सभेच्या शेवटी ' विद्यापीठ विकासाठी एक तास' या विषयाअंतर्गत विद्यार्थ्यांची संख्या आपल्या परिक्षेत्रात कशी वाढेल विद्यार्थी विद्यापीठाकडे कसे आकृष्ठ होतील, विद्यार्थ्यांच्या रोजगारासाठी काय करता येईल, आदी विषयांवर अधीसभेत चर्चा करण्यात आली. विद्यापीठ विकासाबाबत हा अभिनव आणि स्तुत्य प्रयोग निश्चित यशस्वी होईल. असा आशावाद सर्व सिनेट सदस्यांनी व्यक्त केला. 
या अधीसभेच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे , प्र-कुलगुरु डॉ. श्रीराम कावळे, सदस्य सचिव म्हणून दिनांक ९ नोव्हेंबर रोजी कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण यांनी तर दिनांक २० नोव्हेंबर रोजी प्रभारी कुलसचिव म्हणून डॉ. अनिल चिताडे यांनी कामकाज पाहिले.

Share News

copylock

Post Top Ad

-->