बुथ सशक्तिकरण महाविजय २०२३-२४ अभियानांतर्गत शक्ती केंद्र प्रमुख व बुथ प्रमुखांची महत्वपूर्ण जबाबदारी : खा. अशोक नेते - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



"विदर्भ न्यूज इंडिया" कडून वाचक,जाहिरातदार,हितचिंतक व समस्त जनतेला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...

बुथ सशक्तिकरण महाविजय २०२३-२४ अभियानांतर्गत शक्ती केंद्र प्रमुख व बुथ प्रमुखांची महत्वपूर्ण जबाबदारी : खा. अशोक नेते

दि. १० नोव्हेंबर २०२३ 

Vidarbha News India 

बुथ सशक्तिकरण महाविजय २०२३-२४ अभियानांतर्गत शक्ती केंद्र प्रमुख व बुथ प्रमुखांची महत्वपूर्ण जबाबदारी : खा. अशोक नेते

विदर्भ न्यूज इंडिया 

चंद्रपूर (ब्रम्हपुरी) : महाविजय २०२३-२४ अभियानांतर्गत बूथ सशक्तिकरण अभियान आढाव्याच्या संदर्भात आज ब्रह्मपुरी तालुक्याची भाजपा पदाधिकाऱ्यांची अतिशय महत्त्वपूर्ण संघटनात्मक बैठक आज १० नोव्हेंबर २०२३ रोज शुक्रवारला, दुर्गा मंगल कार्यालय, नागभिड रोड ब्रम्हपुरी येथे पार पडली.

महाविजय २०२३-२४ या बुथ सशक्तीकरण अभियानांतर्गत खासदार अशोक नेते यांनी उपस्थितीतांना मार्गदर्शनपर बोलतांना भाजपाचे बुथ सशक्तीकरण हे अभियान विधानसभा व लोकसभा निवडणूक जिंकण्याचा महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे प्रत्येक बुथ कार्यकर्त्याने गांभीर्याने घेऊन बुथ सशक्तीकरण अभियान यशस्वी करावे.

बुथ यंत्रणा सक्षम झाली तर निवडणूक जिंकता येईल, असे आवाहन खा. अशोक नेते यांनी केले.

गेल्या ९ वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांनी राबवलेले योजना व समाजोपयोगी उपक्रम घराघरात पोहचवणे ही बूथप्रमुखांची जबाबदारी आहे, अशी सूचना खा. अशोक नेते यांनी कार्यकर्त्यांना दिली. 

मोदी सरकारच्या कामकाजाची माहिती देत सध्याच्या काळात कोणत्याही निवडणुका सोप्या राहिलेल्या नाहीत. बूथ यंत्रणा सक्षम झाली, तर निवडणूक जिंकता येते. यासाठी शक्तीकेंद्र प्रमुख व बुथ प्रमुखांची महत्वपूर्ण जबाबदारी असते असे प्रतिपादन महाविजय २०२३-२४ या बुथ सशक्तीकरण आढावाव्या च्या बैठकी प्रसंगी खा. अशोक नेते यांनी केले.

या आढाव्या बैठकीला माजी आमदार वि.प. सदस्य तथा प्रदेश प्रवक्ते गिरिशजी व्यास, ब्रम्हपूरी विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय माजी आमदार प्रा. अतुल देशकर यांनी सुद्धा उत्कृष्ट मार्गदर्शन केले.

या बैठकीला प्रामुख्याने उपस्थित राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु. जनजाती मोर्चा तथा खासदार अशोक नेते, माजी विधानपरिषद सदस्य तथा प्रदेशाचे प्रवक्ते गिरिषजी व्यास, ब्रम्हपूरी विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय माजी आमदार प्रा. अतुल देशकर भाजपा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र प्रमुख प्रा. कादर शेख, भाजपा ओबीसी मोर्चा लोकसभा प्रमुख प्रा. प्रकाश बगमारे, जिल्हा संघटन महामंत्री संजय गजपुरे, भाजपा तालुकाध्यक्ष प्राचार्य अरूण शेंडे, भाजपा शहराध्यक्ष इंजिनियर अरविंद नंदुरकर, प्रा. रामलाल दोनाडकर माजी सभापती तथा अध्यक्ष, संजय गांधी निराधार योजना ब्रम्हपूरी, प्राचार्य सुयोग बाळबुद्धे शहराध्यक्ष भाजयुमो ब्रम्हपुरी शहर, मनोज भूपाल, मनोज वठ्ठे, स्वप्निल अलगदेवे तसेच भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Share News

copylock

Post Top Ad

-->