दि. २ नोव्हेंबर २०२३
चामोर्शी व धानोरा तालुका क्रीडा संकुलासाठी निधी द्या; आमदार डॉ. देवरावजी होळी यांची मागणी
- आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी घेतली राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजयजी बनसोडे यांची भेट
- गडचिरोली जिल्हा स्टेडियम च्या बांधकामाच्या संदर्भात चौकशी करण्याचे मंत्र्यांनी दिले आश्वासन
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : चामोर्शी व धानोरा तालुका क्रीडा संकुलासाठी निधी उपलब्ध करून द्यावा यासाठी आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजयजी बंसोडे यांची मुंबई मंत्रालयात जावून भेट घेतली.
याप्रसंगी त्यांनी गडचिरोली जिल्हा स्टेडियम बांधकामात होत असलेला विलंब व कामाचा दर्जा यासंदर्भात मंत्री महोदयांना अवगत करून दिले असता त्यांनी या संदर्भात लवकरच चौकशी करण्यात येईल असे आश्वासन दिले.