कबड्डी स्पर्धेहून परतताना हारले 'आयुष्याचा सामना', ट्रकने चिरडल्याने दोन खेळाडू ठार.! - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

Advertise

कबड्डी स्पर्धेहून परतताना हारले 'आयुष्याचा सामना', ट्रकने चिरडल्याने दोन खेळाडू ठार.!

दि. 29.11.2023

Vidarbha News India 

कबड्डी स्पर्धेहून परतताना हारले 'आयुष्याचा सामना', ट्रकने चिरडल्याने दोन खेळाडू ठार.!

विदर्भ न्यूज इंडिया 

गडचिरोली/कुरखेडा : कबड्डी स्पर्धेत जिंकण्याच्या इराद्याने सहभागी झालेल्या दोन खेळाडूंना आयुष्याचा सामना हारण्याची दुर्दैवी वेळ आली. स्पर्धेत सहभागी होऊन गावी परतताना वाटेत अज्ञात ट्रकने दुचाकीला धडक दिली.

यात दोघे जागीच ठार झाले, तर एक जखमी झाला. ही घटना कुरखेडा तालुक्यातील पुराडा -कोरची मार्गावर डोंगरगाव फाट्यानजीक २८ नोव्हेंबरला दुपारी ४ वाजता घडली.

आकाश शामशाय नरोटी (वय २३) व नकुल ऐनीसिंग नरोटी (वय २२ दोघेही रा. बेलगाव घाट ता.कोरची) अशी मयतांची नावे असून विक्की फत्तेलाल तोफा (वय २३ रा बेलगाव घाट ) हा जखमी आहे. कुरखेडा तालुक्यातील रानवाही येथे नवयूवक श्रीगणेश क्रीडा मंडळातर्फे तीन दिवसांपासून कबड्डी स्पर्धा सुरु आहेत. यात ९० पेक्षा अधिक संघ सहभागी आहेत. या स्पर्धेत बेलगावचा संघही सहभागी आहे. २८ नोव्हेंबरला बेलगावचा संघ रानवाहीला गेला.

मात्र, नियोजित वेळापत्रकानुसार २८ रोजी बेलगाव संघाचा सामना नव्हता, त्यामुळे आकाश नरोटी, नुकल नरोटी व विक्की तोफा हे गावी परतण्यासाठी दुचाकीवरुन ट्रिपलसीट निघाले तर उर्वरित खेळाडू रानवाहीलाच मुक्कामी राहिले. दरम्यान, डोंगरगाव फाट्याजवळ एका दुचाकीला अज्ञात ट्रकने धडक दिली. यानंतर दुचाकीवरील तिघेही खाली कोसळले. चालक ट्रकसह सुसाट निघून गेला. पुराडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आकाश नरोटी व नकुल नरोटी हे जागीच गतप्राण झाले. जखमी विक्की तोफा यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

गाव शोकमग्न, खेळाडूंंना अश्रू अनावर

दरम्यान, मयत आकाश नरोटी व नुकल नरोटी या दोघांची परिस्थिती हालाखीची होती. प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी दुर्गम भागात राहून कबड्डीचे कौशल्य अवगत केले होते. परिसरातील अनेक स्पर्धांमध्ये सहभागी होऊन त्यांनी संघाला विजय मिळवून दिला होता. त्यांच्या अपघाती निधनाने गावावर शोककळा पसरली असून कुटुंब शोकमग्न झाले. संघातील सहकारी खेळाडूंनाही अश्रू अनावर झाले होते.


Share News

copylock

Post Top Ad

-->