रेशनकार्ड धारकांसाठी सरकारचा मोठा निर्णय; पाच वर्षांसाठी 'ही' सुविधा मोफत मिळणार.! - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

Advertise

रेशनकार्ड धारकांसाठी सरकारचा मोठा निर्णय; पाच वर्षांसाठी 'ही' सुविधा मोफत मिळणार.!

दि. ३० नोव्हेंबर २०२३

Vidarbha News India 

रेशनकार्ड धारकांसाठी सरकारचा मोठा निर्णय; पाच वर्षांसाठी 'ही' सुविधा मोफत मिळणार.!

विदर्भ न्यूज इंडिया 

दिल्ली : जर तुम्हीही रेशन कार्ड असलेल्या 80 कोटी लोकांपैकी एक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त आहे. केंद्र सरकारद्वारे चालवल्या जाणाऱ्या प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत (PMGKAY) गरिबांना मोफत रेशन देण्याची योजना वाढवण्यात आली आहे.या योजनेअंतर्गत पुढील ५ वर्षे नागरिकांना मोफत अन्नधान्य पुरवले जाणार असून त्यासाठी ५ वर्षांत ११.८० लाख कोटी रुपये खर्च करणार आहे.

या अंतर्गत गरीबांना दरमहा ५ किलो मोफत अन्नधान्य दिले जाते. पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. कोरोनाकाळात अनेकांवर उपासमारीची वेळ आली होती. नागरिकांची ही अडचण लक्षात घेता पीएमजीकेएवाय ही योजना सुरू करण्यात आली होती. यामध्ये प्रत्येक गरजू व्यक्तींना ५ किलो अनुदानित अन्नधान्याव्यतिरिक्त दर महिन्याला ५ किलो मोफत अन्नधान्य दिले जाते. ही योजना पुढील ५ वर्षांसाठी वाढवल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

पीएमजीकेएवाय अंतर्गत १ जानेवारी २०२४ पासून पाच वर्षांसाठी मोफत अन्नधान्याची तरतूद आहे. या योजनेसाठी राष्ट्रीय अन्न आणि पोषण सुरक्षेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दीर्घकालीन वचनबद्धता नागरिकांना दिसत आहे. मोफत अन्नधान्याच्या तरतुदीमुळे समाजातील बाधित वर्गाच्या कोणत्याही आर्थिक अडथळ्याचे शाश्वत रीतीने शमन होईल आणि लाभार्थ्यांना शून्य खर्चासह दीर्घकालीन किंमत धोरणाची हमी राहील.

लाभार्थ्यांचे कल्याण लक्षात घेऊन देशातील अन्न आणि पोषण सुरक्षा बळकट करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची समर्पित वृत्ती आणि वचनबद्धता दर्शवणारा हा ऐतिहासिक निर्णय आहे असं म्हटलं जातंय.



Share News

copylock

Post Top Ad

-->