दि. २३.११.२०२३
आदिवासी गोंडगोवारी जमाती तर्फे ११४ आदिवासी गोंडगोवारी जमात बांधवाना भावपूर्ण श्रध्दांजली.!
प्रतिनिधी/गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील माडे आमगांव चेक नं. १ या गावी आदिवासी गोड गोवारी संस्कृती व कल्याण गंडकर आदिवासी गोंडगोवारी जमात संघटना चामोर्शी/मुलचेरा व आदिवासी गोंड गोवारी जमात संघटना माडे आमगांव चेक नं. १ च्या वतीने ११४ आदिवासी गोंडगोवारी शाहिद बांधवाना श्रध्दांजली अर्पण करुण, धर्मगुरु कुपार लिंगो व बडा देव गोंगो, शिवाऱ्या पेठा गोंगो यांची पूजा करण्यात आली.
या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून सामाजीक कार्यकर्ता सुनिल डी. नेवारे रेगडी यांनी मार्गदर्शन केले. अमोल पुंगाटी सरपंच, शारदा तावाडे उपसरपंच, गाव भुमिया लालसु मोहंदा, चंदु मोहंदा, रावजी मोहंदा, मंचू पुंगाटी, रामदास मडावी, महेश कुळेटी, दिवाकर कुळेटी, रावजी टी. मोहंदा, शामराव पुंगाटी, मधुकर कुरखेडे, रामदास खोब्रागडे, सुरेश लेकामी, उमेश मडावी, राकेश चांदेकर, सोमजी मोहंदा, संतोष परसा, तुकाराम मोहंदा, तुळशीराम ठाकरे, तुळशीराम शेंद्रे, अमर नेवारे, रमेश बोहरे, माया नेवारे आदि मार्गदर्शकांनी व्याख्यान दिले.
२३ नोव्हेंबर १९९४ रोजी शरद पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना तत्कालीन सरकारच्या काळात आदिवासी गोवारी जमातीच्या लाखो लोकांनी आपल्या या न्याय व हक्कासाठी अधिवेशनावर मोर्चा काढला. होता. त्यात एक प्रकारे हत्याकांड घडवून आणून...
निरपराध ११४ आदिवासी गोवारी बांधवांचा तत्कालीन सरकारने बळी घेतला व ज्या फोटोग्राफर ने या हत्याकांडाचे व्हिडीओ सुटिंग करून ठेवले होते त्याची शासनाच्या लोकांनी तोडफोड केली. व अंख्य प्रशासन हलविणारे पुरावे नस्ट केले. एवढी थरारक घटना ही भारतीय स्वातंत्र्याच्या काळात काळीमा फासणारी घटना काँग्रेस सरकारच्या काळात घडवून आणल्या गेली. मात्र आजपर्यंत कुठलाही शासन स्तरावर या जमातीसोबत न्याय करण्यात आला नसल्याचा आरोप करण्यात आला.
मार्गदर्शकांनी आपल्या व्याख्यानात सांगितले की, सुप्रीम कोर्टाचा सिविल अपील क्र. ४०९६/२०२० दिनांक १८ डिसेंबर २०२० चा निकाल हा गोवारी जमातीच्या बाजुने दिला असुन, जे गोवारी जमातीचे व्यक्ती व समुदायिक लोक ढाल पुजतात. त्यांना न्यायालयाने गोंडगोवारी आहेत. आपण जरी गोवारी असलो तरी आपल्याला सुप्रीम कोर्टाने गोंड गोवारी समजले असुन गोवारीची एन्ट्री ही गोंड गोवारी नावाने संविधानक नोंद झाली. सदर या कार्यक्रमात माडे आमगांव येथिल आदिवासी समाजबांधव व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यशस्वीतेसाठी आदिवासी गोंड गोवारी जमात बांधव व क्रांतीसुर्य बिरसा मुंडा मंडळातील युवक-युवतींनी मोलाचा वाटा उचलला.