शाळा व वाचनालयांना पुस्तक खरेदी सवलत योजना.! - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



"विदर्भ न्यूज इंडिया" कडून वाचक,जाहिरातदार,हितचिंतक व समस्त जनतेला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...

शाळा व वाचनालयांना पुस्तक खरेदी सवलत योजना.!

दि. १ डिसेंबर २०२३
Vidarbha News India 
शाळा व वाचनालयांना पुस्तक खरेदी सवलत योजना.!
- पंच्याहत्तर हजार रुपयांची पुस्तके अठरा हजार पाचशे रुपयात.!
विदर्भ न्यूज इंडिया 
प्रतिनिधी/चंद्रपूर : महाराष्ट्र शासन हे 'गाव तिथे वाचनालय' हे धोरण राबवित आहे. वाचन संस्कृती समृध्द करण्याचे उद्देशाने शासनाने विविध योजना निर्माण केलेल्या आहेत. याच अभियाना अंतर्गत अरिहंत बुक डिस्ट्रीब्युटर्सच्या वतीने भव्य पुस्तक खरेदी सवलत योजना बनविली आहे. या योजने अंतर्गत मुळ किमंत पंच्याहत्तर हजार रुपये असणारी पाचशे पुस्तके फक्त अठरा हजार पाचशे रुपयात देण्यात येणार आहे. ही योजना महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हयात मर्यादीत स्वरुपात राहणार आहे. 'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य' हे तत्व स्विकारले असल्याची माहिती अरिहंत बुक डिस्ट्रीब्युटर्सचे संचालक सुरेश डांगे यांनी दिली आहे.
महाराष्ट्रातील वाचन संस्कृती समृध्द व्हावी या उद्देशाने शंभर पुस्तकांचे पंधरा हजार रुपये छापील किमंतीचे वेगवेगळे संच आम्ही उपलब्ध करुन दिले आहेत. यात एकुण पाचशे पुस्तकांची मुळ किमंत पंच्याहत्तर हजार रुपये असुन ती शाळा, महाविद्यालय, सार्वजनिक वाचनालय व अन्य अभ्यासु व्यक्तीकरिता केवळ अठरा हजार पाचशे रुपयामध्ये देण्याचा आम्ही संकल्प केला असल्याचे सांगुन अरिहंत बुक डिस्ट्रीब्युटर्सचे संचालक सुरेश डांगे पुढे म्हणतात, एकुण शंभर पुस्तकांचा केवळ एक संचाची मुळ किमंत पंधरा हजार रुपये आहे. एक संच खरेदी केल्यास  पाच हजार रुपये, कोणतेही दोन संच खरेदी केल्यास नऊ हजार पाचशे रुपये, तिन संच खरेदी केल्यास बारा हजार पाचशे रुपये, कोणतेही चार संच खरेदी केल्यास फक्त पंधरा हजार पाचशे रुपये व सर्व पाचही संच खरेदी केल्यास फक्त अठरा हजार पाचशे रुपयात देण्यात येतील.
महाराष्ट्र शासन ग्रंथ निवड व शिफारस समितीने मान्यता देण्यात आलेली पुस्तके राहतील. एकुण पाच संचातील तीन संचात चाळीस टक्के शासनमान्य व उर्वरीत दोन संच हे पुर्णतः म्हणजे शंभर टक्के शासनमान्य राहतील. शासनमान्य पुस्तकांवर शासन मान्यतेच्या मंजुरी क्रमांक असेल. सर्वच दर्जेदार, कथा, कादंबरी, ललीत, बालवाडःमय व संदर्भ या विषयाचा समावेश आहे. अशी माहिती देण्यात आली.
पुस्तक खरेदी भव्य सवलत योजने अंतर्गत महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हयातील फक्त शंभर शाळा, महाविद्यालय व सार्वजनिक वाचनालय सहभागी होवु शकतात. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य हे तत्व असल्यामुळे ही योजना ३ नोव्हेंबर पासुन सुरु केली असुन वाचनालयाचा प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचे समाधान बुक डिस्ट्रीब्युटर्सचे संचालक डांगे यांनी व्यक्त केला आहे.
या योजनेसंदर्भात सविस्तर माहिती व पुस्तकांची यादी संदर्भात सुरेश डांगे चिमूर जि. चंद्रपूर मो. ८६०५५९२८३० यांचेशी प्रत्यक्ष भेट घेवुन अथवा भ्रमणध्वनीवर संपर्क साधता येतो. पुस्तक पाठविण्याचा खर्च हा शाळा, महाविद्यालय व सार्वजनिक वाचनालयाना द्यावा लागणार नाही. महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्हयात पुस्तकांचे पार्सल स्वखर्चाचे पाठविण्याची सुविधा उपलब्ध आहे अशी माहिती डांगे यांनी दिली.

Share News

copylock

Post Top Ad

-->