दि. 20.12.2023
गोंडवाना विद्यापीठात आंतर महाविद्यालयीन 'अविष्कार' स्पर्धेचे उद्घाटन.!
- आपले संशोधन समाजातील लोकांच्या उपयोगाचे असायला हवे : डॉ. दिलीप पेशवे
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : आपल्या या परिसरात आविष्काराची नितांत आवश्यकता आहे. डोक्यामध्ये येणाऱ्या आयडिया चे एम्प्लिमेंटेशन करण्यासाठी, काहीतरी वेगळ निर्माण करण्यासाठी डोक्याची जुगाड टेक्नॉलॉजी वापरण्याची गरज आहे. आपल्याला सगळ्यात जास्त ज्ञान देणारी ही आपली आई आहे. आपली दृष्टी व्यापक होऊ शकते. आईकडून जेवढे शिकता येईल तेवढे शिकून घ्यायला हवय. तुमच्याकडे असलेल्या कौशल्यांना पैलू पाडता यावे. यासाठी या आविष्कार स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. आपले संशोधन समाजातील सर्व वर्गांपर्यंत आपण नेऊ शकतो का त्यासाठी काय करता येईल. आपल्या या संशोधनाचा समाजाला उपयोग व्हायला हवाय. असा सल्ला नागपूर येथील व्हीएनआयटीचे प्रा. दिलीप पेशवे यांनी विद्यार्थ्यांना दिला.
विद्यार्थ्यांच्या संशोधन वृत्तीला चालना देण्यासाठी आंतर महाविद्यालयीन संशोधन उत्सव अविष्कार स्पर्धेचे आयोजन विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने आज करण्यात आले. त्यावेळी ते उदघाटक म्हणून बोलत होते. यावेळी त्यांनी अनेक उदाहरणं देत विद्यार्थ्यांनी संशोधन वृत्ती कशी बाळगली पाहिजे हे स्पष्ट केले.
यावेळी मंच्यावर अध्यक्षस्थानी गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, प्रमुख अतिथी म्हणुन प्र-कुलगुरु डॉ. श्रीराम कावळे व कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण तसेच विद्यार्थी विकास विभागाच्या संचालक डॉ. प्रिया गेडाम उपस्थित होत्या.
अध्यक्षस्थानावरून बोलताना गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे म्हणाले, महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत आर्थिकदृष्टया आपला जिल्हा मागे आहे. मग हे मागे असण्याचे कारण काय आहे. कोणताही प्रशासकीय अधिकारी हा मागासलेपणा दूर करण्याचा महत्वाचा मार्ग नाही तर आपण आपल्या समाजातील समस्यांवर जर मात करू शकलो तर खऱ्या अर्थाने ते संशोधन झाले. बांबूच्या बेटांमध्ये ऑड नंबरचे बांबू असते. मग ते ओळखायचे कसे हे खऱ्या अर्थाने आविष्कार होय. आपल्या समस्येवर उत्तर शोधणे गरजेचे आहे. असे ते म्हणाले.
प्रास्ताविक संचालक विद्यार्थी विकास डॉ. प्रिया गेडाम, संचालन विद्यापीठाचे विद्यार्थी विकास आचेवार, आभार जितेश बनसोड यांनी मानले.
या कार्यक्रमाला सिनेट सदस्य संजय रामगिरवार, डॉ. मिलिंद भगत, तसेच विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.