काँग्रेसच्या वाट्याला लोकसभेच्या किती जागा? वडेट्टीवारांनी स्पष्टच सांगितलं.! - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



"विदर्भ न्यूज इंडिया" कडून वाचक,जाहिरातदार,हितचिंतक व समस्त जनतेला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...

काँग्रेसच्या वाट्याला लोकसभेच्या किती जागा? वडेट्टीवारांनी स्पष्टच सांगितलं.!

दि. 29.12.2023

Vidarbha News India 

काँग्रेसच्या वाट्याला लोकसभेच्या किती जागा? वडेट्टीवारांनी स्पष्टच सांगितलं.!

विदर्भ न्यूज इंडिया 

दिल्ली : आगामी लोकसभा निवडणूक आता अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. सर्वच प्रमुख पक्ष लोकसभा निवडणुकीच्या कामाला लागले आहेत. देशभरातील विरोधी पक्ष अगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपविरोधात एकवटल्याचं चित्र आहे.

त्यामुळे यावेळची लोकसभा निवडणूक एनडीए विरूद्ध इंडिया आघाडी अशी होणार आहे. इंडिया आणि एनडीएमधील कोणत्या घटक पक्षाला किती जागा मिळणार याबाबत मोठी उत्सकता निर्माण झाली आहे. यावर आता काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

नेमकं काय म्हणाले वडेट्टीवार?

आज काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय आघाडी समितीचे निमंत्रक मुकुल वासनिक यांच्या घरी समितीची बैठक होणार आहे. समितीचे सदस्य आज नऊ राज्यांमध्ये काँग्रेसच्या आघाडीबाबत चर्चा करणार आहेत. याबाबत माहिती देताना वडेट्टीवार यांनी म्हटलं की, आज आघाडीबाबत चर्चा होणार आहे. मात्र कोणी कोणत्या जागा लढवाव्यात याबाबत महाविकास आघाडीच्या बैठकीत निर्णय होईल. काँग्रेसने किती जागा लढाव्यात यावर मी बोलणार नाही, इंडिया आघाडीच्या बैठकीत जे ठरेल ते आम्हाला मान्य असल्याचं वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.

भाजपवर हल्लाबोल

दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी पुन्हा एकदा भाजपावर हल्लाबोल केला आहे. भाजपला राज्यात विधानसभेच्या २८८ जागा कमळाच्या चिन्हावर लढायच्या आहेत. भाजपची चाल एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना कळेल. लोकसभेत त्यांना किती जागा मिळतील हे पाहावं लागेल, असं वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.


Share News

copylock

Post Top Ad

-->