दि. 29.12.2023
Vidarbha News India
crime : झोपताना ती नवऱ्याच्या छातीवर बसली आणि त्याचा खेळ केला खल्लास, त्यानंतर..
विदर्भ न्यूज इंडिया
गाझियाबाद : दिल्ली जवळच्या गाझियाबाद मध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. पती-पत्नीच्या नात्याला लाजवेल अशी घटना समोर आली आहे. हे प्रकरण गाझियाबादच्या क्रॉसिंग रिपब्लिक पोलीस स्टेशन परिसरातलं आहे.
या ठिकाणी 22 डिसेंबर रोजी बेहरामपूर परिसरात एक अनोळखी मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती. हा मृतदेह शिवम उर्फ सोनूचा असून त्याची हत्या झाल्याचं उघड झालं आहे. या हत्येप्रकरणी पोलिसांनी मृताची पत्नी आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे. अनैतिक संबंधांतून ही हत्या झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
मृत शिवमच्या पत्नीचे शेजारी राहणाऱ्या गर्जन यादवसोबत प्रेमसंबंध होते. हा प्रकार पतीला कळताच आरोपी पत्नी आपल्या मुलासह बलिया इथल्या प्रियकराच्या घरी गेली. हा प्रकार पतीला कळताच त्याने पत्नीला समजावलं आणि घरी परत आणलं; पण त्यावेळी पत्नीने तिचा प्रियकर गर्जन यादव यालाही सोबत घरी आणलं. पती, पत्नी आणि तिचा प्रियकर हे तिघंही एकत्र राहू लागले; मात्र काही दिवसांनी तिघांमध्ये वाद सुरू झाला. या भांडणाला कंटाळून एका रात्री पत्नीने पतीच्या छातीवर बसून त्याचा गळा दाबण्यास सुरुवात केली. तिच्या प्रियकरानेही तिला पतीला मारण्यास मदत केली. प्रियकराने प्रेयसीच्या पतीवर चाकूने सपासप वार करून खून केला. त्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावली.
वेब सिटी एसीपी सलोनी अग्रवाल यांनी सांगितलं, की आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींमध्ये मृत शिवमची पत्नी प्रियांका आणि तिचा प्रियकर गर्जन यादव यांचा समावेश आहे. शिवमची पत्नी प्रियांका ही जालौनच्या गोहन भागातल्या नावरची रहिवासी असून, तिचा प्रियकर गर्जन यादव हा बलिया जिल्ह्यातल्या सईया या गावचा रहिवासी आहे. प्रियांका नुकतीच शिवमसोबत रिपब्लिक क्रॉसिंग जवळच्या बहरामपूरमध्ये भाड्याच्या घरात राहत होती. शिवम टॅक्सी बाइक चालवत होता.
शिवमची हत्या करण्यासाठी वापरण्यात आलेला चाकू जप्त करण्यात आला आहे. दोन्ही आरोपींना अटक करून त्यांची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे, असं सलोनी अग्रवाल यांनी सांगितलं. या घटनेमुळे शिवम व प्रियांका यांचा मुलगा मात्र पोरका झाला आहे.