दि. 29.12.2023
राज्यस्तरीय 'आव्हान' शिबिरात कुलगुरु डॉ. प्रशांत बोकारे यांचे प्रेरणादायी भाषण.! Motivational speech
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठाच्या वतीने सुरू असलेल्या राज्यस्तरीय आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबिर आव्हान मध्ये शासकीय विज्ञान महाविद्यालयात सायंकाळच्या सत्रात कुलगुरु
डॉ. प्रशांत बोकारे यांचे प्रेरणादायी भाषण झाले. Motivational speech
यावेळी विद्यार्थ्यां मध्ये प्रचंड उत्साह होता.
यावेळी ते म्हणाले, प्रत्येक विद्यार्थ्यांने आपण या जगात का आलोय, याचा विचार करायला हवाय. मला काही येत नाही हा विचार सर्वप्रथम डोक्यातून काढून टाकायला हवाय. आपण तेच बनतो जो विचार आपण करतो.यशाच्या शिखरावर जायचं असल्यास सकारात्मक विचार करायला हवा. सगळ्यांना देवाने सारखाच डोकं दिलय.
समाजामध्ये आलोय याचा अर्थ समाजात असलेल्या समस्यांवर आपल्याला उत्तर शोधायचे आहे. म्हणजे आपण समाधान देणाऱ्यांच्या लिस्टमध्ये आहोत. आपल्याकडे असलेल्या कौशल्याचा समाजाला कसा उपयोग होईल याचा विचार आपण करायला हवाय असे प्रेरक विचार त्यांनी यावेळी व्यक्त केले.यावेळी
विद्यार्थ्यांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांचं निरसन त्यांनी केलं.
विद्यार्थ्यांनी याचा प्रकर्षाने विचार करायला हवाय यासाठी त्यांनी सांगितलेल्या बाबी
आपल्या कामावर लक्ष केंद्रित करा.
स्वतःला समाधान म्हणून पहा.
स्वतःच्या कौशल्याला धार द्या. सगळ्या समस्यांचे उत्तर आपल्याजवळच आहे.
निगेटिव्ह विचार करणाऱ्या लोकांपासून दूर राहा.
आपल्या गुणवत्तावाढीसाठी प्रयत्न करा.
कोणाच्या मनात आत्महत्येचे विचार घोंगावत असतील, तर त्यांना आत्महत्या करण्यापासून परावृत्त करा.
नोकरी मागणारे नाही तर रोजगार देणारे व्हा.