दि. ०८.१२.२०२३
राज्यपाल रमेश बैस रविवारी गडचिरोली जिल्ह्यात.!
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : दिनांक १० डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता महाराष्ट्राचे राज्यपाल रमेशं बैस हे पोरला या गावी भेट देणार आहे. संकल्प विकसित भारत आणि महिला सशक्तीकरण अभियान याच्या कार्यक्रम करिता ते येणार आहे. त्यावेळी धर्मरावबाबा आत्राम मंत्री, तसेच जिल्ह्यातील सर्व आमदार खासदार उपस्थित राहणार आहेत. यावेळी विविध विभागाच्या लाभार्थीला लाभ देण्यात येणार आहे.
तसेच सर्व विभागच्या योजनेचे स्टॉल असणार आहे. प्रशासनाने यासाठी जय्यत तयारी केली आहे.श्री. संजय मीना जिल्हाधिकारी,श्रीमती आयुशी सिंग मुख्य कार्यकारी अधिकारी, श्री.धनाजी पाटील अतिरिक्त जिल्हाधिकारी,श्री.राजेंद्र भुयार अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी,श्री.प्रशांत शिर्के प्रकल्प चालक, डॉ. सचिन मडावी सहाय्यक आयुक्त, श्री. फरेंद्र कुत्तीरकर प्रकल्प संचालक,श्री.चेतन हिवंज उपमुख्य कार्यकारी अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी सर्व अधिकारी यांनी आज पोरला गावाची पाहणी करून कार्यक्रमाचा आढावा घेतला. प्रशासनाची जय्यत तय्यारी सुरू असून.७ ते ८ हजार लोक कार्यक्रमाचा लाभ घेणार आहे.