थेट अर्ज करा आणि मिळवा महाराष्ट्र शासनाची नोकरी, तब्बल 670 जागांवर भरती सुरू.. - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

Advertise

थेट अर्ज करा आणि मिळवा महाराष्ट्र शासनाची नोकरी, तब्बल 670 जागांवर भरती सुरू..

दि. 26.12.2023

Vidarbha News India 

थेट अर्ज करा आणि मिळवा महाराष्ट्र शासनाची नोकरी, तब्बल 670 जागांवर भरती सुरू, या विभागात..

विदर्भ न्यूज इंडिया 

मुंबई : सरकारी नोकरी करण्याची आहे? मग ही अत्यंत मोठी संधी तुमच्यासाठी आहे. थेट मेगा भरतीला सुरूवात झालीये. महाराष्ट्र शासनाच्या एका महत्वाच्या विभागाकडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही मोठी संधी आहे.

उमेदवारांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावीत. ही भरती प्रक्रिया तब्बल 670 जागांसाठी होत आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 10 जानेवारी 2024 आहे. इच्छुक उमेदवारांना त्यापूर्वीच या भरतीसाठी अर्ज करावी लागणार आहेत.

ही भरती प्रक्रिया महाराष्ट्र शासन आयुक्त मृद व जलसंधारण, मृद व जलसंधारण विभागाच्या अधिपत्याखाली जलसंधारण व जिल्हा परिषद यंत्रणेमधील जलसंधारण अधिकारी गट ब (अराजपत्रीत) या पदांसाठी होत आहे. ही भरती प्रक्रिया महाराष्ट्र शासन आयुक्त मृद व जलसंधारण छत्रपती संभाजीनगर यांच्याकडून राबवली जात आहे.

नुकताच या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना ही प्रसिद्ध करण्यात आलीये. या भरती प्रक्रियेसाठी शिक्षणाची अट ही ठेवण्यात आलीये. स्थापत्य अभियांत्रिकीमध्ये पदविका अथवा डिप्लोमा उमेदवाराचा झालेला असावा. या भरती प्रक्रियेसाठी वयाची अट देखील ठेवण्यात आलीये. प्रवर्गातील उमेदवारांना वयाच्या अटीमध्ये सूट ही देण्यात आलीये.

या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज हा करावा लागणार आहे. तसेच उमेदवाराची परीक्षा देखील घेण्यात येणार आहे. ऑनलाइन पद्धतीनेच या भरती प्रक्रियेसाठी परीक्षा घेतली जाईल. उमेदवारांना या भरती प्रक्रियेसाठी 1000 रूपये फिस ही भरावी लागणार आहे. प्रवर्गातील उमेदवारांना फिसमध्ये सूट देण्यात आलीये.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करतानाच आपल्याला काही महत्वाची कागदपत्रे ही अपलोड करावी लागणार आहेत. यासोबत आपला सध्याचा चालू असलेला मोबाईल नंबर देखील नमूद करावा लागणार आहे. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा. परत एकदा लक्षात ठेवा की, या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख ही 10 जानेवारी 2024 आहे. त्यापूर्वी आलेले अर्ज ग्राह्य धरले जातील.

Share News

copylock

Post Top Ad

-->