संसदेच्या सुरक्षेत गंभीर चूक, प्रेक्षक गॅलरीतून लोकसभेच्या सभागृहात दोन जणांनी मारली उडी.! - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

Advertise

संसदेच्या सुरक्षेत गंभीर चूक, प्रेक्षक गॅलरीतून लोकसभेच्या सभागृहात दोन जणांनी मारली उडी.!

दि. १३ डिसेंबर २०२३ 
Vidarbha News India 
मोठी बातमी : संसदेच्या सुरक्षेत गंभीर चूक, प्रेक्षक गॅलरीतून लोकसभेच्या सभागृहात दोन जणांनी मारली उडी.!
Parliament Winter Session 2023: संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान लोकसभेतील सुरक्षेमध्ये गंभीर चूक घडली असून, आज लोकसभेचे कामकाज सुरू असताना प्रेक्षक गॅलरीमधून दोन जणांनी सभागृहात उडी मारली.
विदर्भ न्यूज इंडिया 
नवी दिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान लोकसभेतील सुरक्षेमध्ये गंभीर चूक घडली असून, आज लोकसभेचे कामकाज सुरू असताना प्रेक्षक गॅलरीमधून दोन जणांनी सभागृहात उडी मारली. तसेच या दोघांनी सभागृहातील बेंचवर उड्या मारून गोंधळ घातला. त्याबरोबरच त्यांनी सभागृहात स्मोक कँडल पेटवल्या. दरम्यान, या दोघांनाही पकडण्यात यश आले असून, त्यांची चौकशी सुरू आहे. मात्र या प्रकारामुळे खळबळ उडाली असून, लोकसभेचे कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले आहे.
याबाबत माहिती देताना काँग्रेस खासदार अधीररंजन चौधरी यांनी सांगितले की, दोन तरुणांनी प्रेक्षक गॅलरीतून सभागृहात उड्या मारल्या. त्यांनी काही वस्तू फेकल्या. त्यातून धूर येत होता. मात्र या तरुणांना खासदारांनी पकडले आणि सुरक्षारक्षकांच्या ताब्यात दिले.

Share News

copylock

Post Top Ad

-->