गोंदिया जिल्ह्यातील बिरसी येथील विमान सेवा सुरू करावे; - खासदार अशोक नेते - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



"विदर्भ न्यूज इंडिया" कडून वाचक,जाहिरातदार,हितचिंतक व समस्त जनतेला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...

गोंदिया जिल्ह्यातील बिरसी येथील विमान सेवा सुरू करावे; - खासदार अशोक नेते



दि. ०८.१२.२०२३ 
Vidarbha News India 
गोंदिया जिल्ह्यातील बिरसी येथील विमान सेवा सुरू करावे; - खासदार अशोक नेते
- विमान सेवा सुरु झालेली बंद केली ती पूर्ववत विमान सेवा सुरू करावे.! 
- तसेच गडचिरोली येथे विमान सेवा सुरू करण्यासंबंधी नियम -३७७ अन्वये अधिवेशनात खासदार अशोक नेते यांनी केली मागणी.! 
विदर्भ न्यूज इंडिया 
गडचिरोली : खासदार अशोक नेते यांनी गडचिरोली मध्ये विमान सेवा सुरू करण्यासंदर्भात नियम ३७७ अन्वये अधिवेशनात मागणी केलेली आहे. गडचिरोली-चिमूर हा देशातील सर्वात मोठा दुर्गम आणि नक्षलग्रस्त, अविकसित असलेला मागासलेला भाग असुन क्षेत्रफळाच्या दृष्टिने सुद्धा विस्तृत विस्तारीत गडचिरोली जिल्हा पसरलेला आहे. तसेच गडचिरोलीपासून सुमारे २०० किलोमीटर अंतरावर गोंदिया जिल्ह्यामध्ये बिरसी येथे विमानतळ उभारण्यात आले. या विमानतळावरून विमान सेवाही सुरू झाली होती, मात्र ती सध्या बंद आहे. त्यामुळे विमान सेवा सुद्धा पूर्ववत सुरू ठेवावी. या दोन्ही अधिवेशना दरम्यान खासदार अशोक नेते यांनी मागण्या केल्या.
गडचिरोली ते नागपूर विमानतळाचे अंतरही गडचिरोलीपासून २०० किलोमीटर आहे.
गडचिरोलीत विमानतळ उभारणीसाठी जिल्हाधिकारी, गडचिरोली यांच्याकडून प्रस्ताव पाठविण्यात आला होता, मात्र आजतागायत त्यात कोणतीही लक्षणीय प्रगती झालेली नाही.
गडचिरोलीत विमानतळ उभारण्यासाठी अर्थपूर्ण पावले उचलावीत, अशी सभागृहाच्या माध्यमातून सरकारला नियम-३७७ अन्वये दिल्ली येथील अधिवेशनात खासदार अशोक नेते यांनी मागणी केली आहे.
👇संपूर्ण व्हिडिओ बघा👇



Share News

copylock

Post Top Ad

-->