दि. 31.12.2023
राज्यस्तरीय 'आव्हान' शिबिरातील रॅलीने घडविले महाराष्ट्रीयन संस्कृतीचे दर्शन.!
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : राज्यस्तरीय दहा दिवसीयआपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबिर 'आव्हान' गोंडवाना विद्यापीठाच्या वतीने आयोजित करण्यात आले आहे. आजच्या सातव्या दिवशी
राज्यस्तरीय आपत्ती व्यवस्थापन शिबीर आव्हान ची रॅली सुमानंद सभागृह पासून शहराच्या मुख्य मार्गाने मार्गक्रमण करत निघाली. तत्पूर्वी गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. प्रशांत बोकारे यांनी मशाल पेटवून तसेच रॅलीला हिरवा झेंडा दाखवून रवाना केले.
याप्रसंगी मानव विज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. चंद्रमौली, गोडवाना विद्यापीठाचे रासेयो संचालक तसेच आवाहन २०२३ चे समन्वयक डॉ. शयाम खंडारे, सहसमन्वक डॉ. प्रिया गेडाम, एन. डी आर. एफ. चे निरीक्षक पंकज चौधरी, नागपूर विद्यापीठाचे परीक्षक सतिश चाफले, जळगाव विद्यापीठाचे परीक्षक सचिन नाद्रे, नागपूर विद्यापीठाचे रासेयो संचालक सोपानदेव पिसे,गडचिरोली जिल्हा रासेयो समन्वयक डॉ.श्रीराम गहाणे, चंद्रपूर जिल्हा समन्वयक विजया गेडाम, विभागीय समन्वयक उषाताई खंडाळे, डॉ पवन नाईक, डॉ. गुरुदास बल्की, प्रदीप चाफले आदी उपस्थित होते.
धार्मिक सलोखा, एकात्मता, भारतीय संविधान, वारकरी संप्रदाय, विज्ञान तंत्रज्ञानामुळे झालेली प्रगती, पर्यावरण, मतदान जागृती अशा अनेक विषयांची हाताळणी करणारे देखावे, नृत्य, पोस्टर्स,
विविध विषयांवरील फलक आणि सजीव देखावे या वेळेला राज्यातील विविध विद्यापीठातून आलेल्या विद्यार्थ्यांनी सादर केले. यातून विविधतेतून एकता आणि महाराष्ट्रीयन संस्कृतीचे दर्शन विद्यार्थ्यांनी घडविले. या रॅलीत गोंडवाना विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी रेला नृत्य तसेच डॉ. प्रकाश आमटे आणि मंदाकिनी आमटे यांची वेशभूषा, झाडीपट्टी रंगभूमीवर पोस्टर, अभय बंग, बाबा आमटे यांचे कार्य, जल, जंगल, जमीनचे महत्व, या भागातील संस्कृतीक वारसा, येथील आदिवासी संस्कृतीचे दर्शन विद्यार्थ्यांनी घडविले.
वाहतुकीला कुठलीही अडचण निर्माण न होऊ देता अगदी व्यवस्तीतरित्या ही रॅली गडचिरोली शहरातील सुमानंद सभागृहापासून इंदिरा गांधी चौक, पुढे शहरातील मुख्य मार्गाने मार्गक्रमण करत सुमानंद सभागृहात विसर्जित करण्यात आली. या संपूर्ण रॅलीत विद्यार्थ्यांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता.
महाराष्ट्रातील २२ विद्यापीठांमधील १००० विद्यार्थी रॅलीत सहभागी झाले होते यामध्ये ३७ पुरुष संघ व्यवस्थापक, ३७ महिला संघ व्यवस्थापक यांचा समावेश होता. या संपूर्ण रॅलीत एन. डी. आर. एफ.च्या चमूनेही मोलाचे योगदान दिले. या रॅली दरम्यान सिनेट सदस्य स्वरूप तारगे याचीही उपस्थिती लाभली. रॅली यशस्वी करण्याकरीता विद्यापीठातील सर्व शिक्षक तसेच शिक्षकेत्तर कर्मचार्यांनी सहकार्य केले.