दि. १४ डिसेंबर २०२३
Vidarbha News India
Gadchiroli News: गडचिरोलीत पोलीस अन् नक्षलवाद्यांमध्ये चकमक, २ नक्षलवादी ठार; एक तास सुरू होता गोळीबार.!
गडचिरोली : बोधिटोलाजवळ चकमकीत २ नक्षली ठार, शोधमोहिमेत जवानांना आढळली एके ४७
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यामध्ये झालेल्या पोलीस आणि नक्षलवाद्यांच्या चकमकीत दोन नक्षलवादी ठार झाल्याची मोठी बातमी समोर आली आहे.
गडचिरोलीच्या धानोरा तालुक्यात ही घटना घडली. पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये तब्बल १ तास गोळीबार सुरू होता. यामध्ये दोघा नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यास पोलिसांना यश आले.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, छत्तीसगड (Chhattisgarh) सीमेवर नक्षलवाद्यांचा एक मोठा तुकडी तळ ठोकून असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे परिसरात शोधमोहीम राबवण्यासाठी पोलीस दल परिसरात शोध घेत असताना नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केला.
नक्षलवाद्यांच्या या गोळीबाराला पोलीस दलाने प्रत्युत्तर दिले. यावेळी पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये जवळपास एक तास गोळीबार सुरू होता. या गोळीबारानंतर परिसरात झडती घेतल्याने एक AK47 आणि एक SLR शस्त्र घेऊन दोन पुरुष नक्षलवादी मृतदेह सापडले आहेत.
मृत्यू झालेल्या दोघांपैकी एकाची प्राथमिक ओळख म्हणजे कसनसूर दलमचा उप कमांडर दुर्गेश वट्टी. दुर्गैश वट्टी हा 2019 मध्ये जांभूळखेडा स्फोटाचा मुख्य सूत्रधार होता. या भीषण स्फोटात गडचिरोली पोलिसांचे 15 पोलीस कर्मचारी शहीद झाले होते. दरम्यान, या चकमकीनंतर पुढील ऑपरेशन्स आणि परिसराचा शोध सुरू आहे.