शिस्तबध्द पथसंचलनाने स्टुडंट पोलीस कॅडेट निवासी शिबिराचा समारोप.! - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

Advertise

शिस्तबध्द पथसंचलनाने स्टुडंट पोलीस कॅडेट निवासी शिबिराचा समारोप.!

दि. 30.12.2023
Vidarbha News India 
शिस्तबध्द पथसंचलनाने स्टुडंट पोलीस कॅडेट निवासी शिबिराचा समारोप.!
पोलीस अधीक्षक गडचिरोली यांचे हस्ते बक्षीस वितरण सोहळा संपन्न.!
जिल्हा परीषद शाळा धानोराच्या विद्यार्थ्यांनी पटकविला प्रथम क्रमांक.!
विदर्भ न्यूज इंडिया 
प्रतिनिधी / गडचिरोली (Gadchiroli) : राष्ट्रीय पोलीस मिशन अंतर्गत गृह मंत्रालय, भारत सरकार यांचेद्वारा सन २०१८ पासून राष्ट्रीय स्तराचर स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम राविलाला जात असल्याने या उपक्रमांतर्गत इयत्ता ०८ वी व ०९ वी मधील विद्यार्थ्यांकरिता आंतरवर्ग, बाह्यवर्ग आणि क्षेत्रीय भेटी आयोजीत करून विद्यार्थ्यांना व्यक्तीमत्व व नितीमत्ता विकासाला उपयुक्त असे प्रशिक्षण दिले जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुप्त कला-गुणांना वाव मिळत असून त्यांच्यात सामाजिक जाणीचा प्रगल्भ होऊन व्यक्तीगत हिताईतकेच सामाजिक जबाबदारीचे भान वाढीस लागत आहेत. तसेच या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना नितीमुल्यांचे महत्व शिकविले जात असुन समाजातील भ्रष्टाचार आणि वाईट चालीरितींचा मुकाचला करण्यासाठी तयार केले जात आहे. यासोबतच विद्यार्थ्यांमध्ये संयम, सहनशिलता, शिस्त व सकारात्मक दृष्टीकोन, नैतिक प्रामाणिकपणा इ. मुल्यांची जडणघडण होण्यासाठी व त्याच्या सर्वांगीण विकासात भर पहावी या उद्देशाने गडचिरोली पोलीस दलातर्फे २६ डिसेंबर २०२३ ते ३० डिसेंबर २०२३ पर्यंत एनसीसीचे धर्तीवर महाराष्ट्रात प्रथमतःच पोलीस मुख्यालय, गडचिरोली येथे स्टुडंट पोलीस कॅडेट उपक्रमांतर्गत पाच दिवसीय निवासी प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.

सदर पाच दिवसीय आयोजीत शिबीरामधील आज शेवटचा दिवस असुन या संपूर्ण शिबिरामध्ये चिद्यांर्थ्यांना कॅम्प करीता लागनान्या साहित्याचे वाटप करुन त्यांच्या निवासस्थान व जेवनाची सोय करण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांना स्टुडंट पोलीस कॅलेट प्रोग्राम, ई सुरक्षा च सायबर सुरक्षा, मुल्ये आणि नितीशास्त्र, महिला आणि मुलींची सुरक्षा, समाजातील वाईट गोष्टीविरुद्ध लढा, नितीतत्वे, संयम, सहनशीलता, संवेदना, सहानुभुती, वडीलधाऱ्यांचा आदर, शिस्त संघभावना, दृष्टीकोन, महाराष्ट्र पोलीस, गुन्हे प्रतिबंध व उपाययोजना, भ्रष्टाचार विरोधी लढा, कम्यूनिटी पोलीसींग, सुरक्षा व रहदारी जागरुकता व नक्षलवाद विरोधात विद्यार्थ्यांची भूमीका या विषयावर तज्ञ मान्यवरांकडुन मार्गदर्शन करण्यात आले. त्यासोबत पोलीस विभागातील अत्याधुनिक हत्याराबाबत शस्त्र प्रदर्शनाद्वारे माहिती देण्यात आली, तसेच पुर परिस्थिती उद्भवल्यास आपत्ती व्यवस्थापन व निवारण दल कशा पद्धतीने लोकांना मदत करतात याचे प्रात्यक्षिक, अग्निशामक दल हे एखादया ठिकाणी आग लागल्यानंतर कशाप्रकारे आगीवर नियंत्रण मिळवून आगीत अडकलेल्या लोकांची मदत करतात याचाबत प्रात्यक्षिक तसेच गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने श्वानपथकाने प्रात्यक्षिकाव्दारे बॉम्ब शोध व गुन्ह्याच्या तपासात श्वानाचे काय महत्य आहे. याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. हे प्रात्यक्षिक प्रत्यक्षात बघतांना विद्यार्थ्यांनी आनंद घेतला. यासोचतच ट्रॅकींग, योगा, शारिरीक कवायत कार्यक्रम, पचसंचलन, कबड्डी, व्हॉलीबॉल, १०० मी धावने, ४०० मी. ४×४ १०० रीले, वक्तृत्व, मायन, समुह नृत्य, वाद-विवाद व समाजातील दृष्ट चालीरीती या विषयांवर पथनाट्य, असे विविध सांस्कृतिक कार्यक्रम, टेन्ट सुशोभिकरण स्पर्धा घेण्यात आले.

आज ३० डिसेंबर २०२३ रोजी निवासी प्रशिक्षण शिबीराचे समारोप प्रसंगी स्टुडंट पोलीस कैडेट यांचे शिस्तबध्द पथसंचलनाचे निरीक्षण पोलीस अधीक्षक यांनी केले. त्यानंतर पोलीस मुख्यालय येथील एकलव्य हॉल येथे बक्षीस वितरण व समारोपीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अपर पोलीस अधीक्षक कुमार चिता यांनी करुन विद्यार्थ्यांनी केलेल्या पथसंचलनाचे कौतुक केले. त्यानंतर स्टुडंट पोलीस कॅडेटच्या लोगोमधील इंग्पेथी, इंटेग्रिटी व डिसीप्लीन या शब्दांचे अर्थ पटवुन सांगितले व पुढील चाटचालीकरीता शुभेच्छा दिल्या. त्यांनतर स्टुडंट पोलीस कॅडेट प्रशिक्षणाकरीता आलेल्या काही विद्यार्थ्यांना आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले की, गडचिरोली पोलीस दलातील जवानांनी आपल्या संरक्षणाकरीता त्यांच्या प्राणाची आहूती दिली, तसेच पोलीस मुख्यालय गडचिरोली येथे पाच दिवसीय रेसीडेंशियल ट्रेनिग कॅम्प हा आयुष्यातील अविस्मरणीय अनुभव असेल याशिचीरामध्ये काय- काय शिकायला मिळाले याबाबत सांगुन गडचिरोली पोलीस दलाचे आभार मानले. त्यानंतर पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी आपल्या समारोपीय भाषणात विद्यार्थ्यांनी केलेल्या पथसंचलन व टेन्ट सुशोभिकरणातील नाविन्यपूर्ण कल्पनेचे कौतुक करत विद्यार्थ्यांना सांगीतले की, विद्यार्थ्यांना घडविण्याचे महत्वाचे कार्य शिक्षक आणि पालक करत असतात. विद्यार्थी हे मातीचा गोळा असून त्याला मूर्ती बनवुन सजविण्याचे कार्य शिक्षक करत असतात विद्यार्थ्यांनी आपले स्वप्न हे डोळे उघडे ठेवून बघावेत आणि स्वप्न पूर्ण होई पर्यंत कठोर मेहनत करावे, यासोबतच सर्व विद्यार्थ्यांना भाची वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

या शिबीरामध्ये घेण्यात आलेल्या विविध स्पर्धा व कार्यक्रमामध्ये गुणानुक्रमाने क्रमांक पटकाविनाऱ्या शाळेच्या विद्यार्थ्यांना पारितोषिक, रोख रक्कम व सन्मानचीन्ह देवून गौरविण्यात आले. त्यामध्ये बेस्ट स्टुडंट कॅडेट पुरुष-पुष्कर पारधी, जवाहर नवोदय घोट, बेस्ट स्टुडंट कॅडेट महिला सुशिला निकेसर, जि.प. हायस्कूल धानोरा, बेस्ट टेन्ट सुश्रोभिकरण जि.प. हायस्कूल धानोरा, बेस्ट पथसंचालन जवाहर नवोदय घोट व सर्वोत्कृष्ट संघ जि.प. हायस्कूल धानोरा यांना रोख रक्कम, सन्मानचीन्ह व प्रशस्तीपत्र देण्यात आले. तसेच कबड्डी, व्हालीचॉल, १०० मी पावने, ४०० मी. ४×४ १०० रिले, वक्तृत्व, गायन, समूहनृत्य, पथनाट्य, वाद-विवाद स्पर्धेमध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय येणाऱ्या विदयार्थ्यांना बक्षीस व प्रशस्तीपत्र देवून सन्मानीत करण्यात आले, यासोबतच सर्च सहभागी दहा शाळेमधील ३०० विद्यार्थ्यांना ग्रुप फोटो व स्मृतीचिन्ह प्रदान करण्यात आले.

सदर कार्यक्रम पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता, अपर पोलीस अयीक्षक (अभियान) यतिश देशमुख व अपर पोलीस अधीक्षक अहेरी एम रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी गडचिरोली मयुर भूजबळ, उपविभागीय पोलीस अधिकारी कुरखेडा साहिल झरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी भामरागड नितीन गणापुरे, उपविभागीय पोलीस अधिकारी जिमलगट्टा, सुजित क्षिरसागर, उपविभागीय पोलीस अधिकारी हेडरी बापुराव दडस व सर्व पोलीस अधीक्षक कार्यालयातील अधिकारी च अंमलदार तसेच एस.पी.सी. समन्वयक अधिकारी, अंमलदार व शाळेतील समन्वयक शिक्षक यांचे उपस्थितीत पार पडला.

सदर कार्यक्रमाच्या यशस्वितेकरीता नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी पोउपनि, धनंजय पाटील, पोउपनि भारत निकाळजे तसेच सर्व पोलीस अंमलदारांनी विशेष परीश्रम घेतले व कार्यक्रमाचे आभार प्रभारी अधिकारी जनसंपर्क कार्यालयाचे पोउपनि शिवराज लोखंडे यांनी मानले.


Share News

copylock

Post Top Ad

-->