दि. 15.12.2023
Vidarbha News India
गडचिरोली : वाघाच्या हल्ल्यात गोविंदपुर येथील महिलेचा मृत्यू.! Tiger attack :
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : आज दिनांक 15 डिसेंबर 2023 दुपारी 12:30 ते 1 वाजताच्या सुमारास गडचिरोली मुख्यालयापासून 12 किमी अंतरावर असलेल्या गोविंदपुर येथील महिलेवर वाघाने हल्ला करून ठार केले.
माया धर्माजी सातपुते (55) रा. गोविंदपुर असे हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे.
माया सातपूते ही नेहमीप्रमाणे गावालगतच्या जंगलात सरपण गोळा करण्यासाठी गेली होती. दरम्यान, अचानक वाघाने तिच्यावर हल्ला चढवून जागीच ठार केला. सदर घटनेमुळे परिसरात भितीचे वातावरण तयार झाले आहे. Tiger attack सदर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन वनविभागाच्या अधिकार्यांनी सातपुते परिवाराला लवकरात लवकर आर्थिक मदत करावी. तसेच या परिसरात वावरत असलेल्या वाघाचा त्वरित बंदोबस्त करून वाघाला जेरबंद करण्यात यावे, अशी मागणी गावकर्यांनी व परिसरातील जनतेनी केली आहे.