दि. 03.12.2023
गडचिरोली जिल्हा वन कर्मचारी सहकारी पतसंस्थाच्या नविन इमारतीतील कार्यालयाचे उद्घाटन सोहळा संपन्न.!
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : गडचिरोली जिल्हा वन कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित, गडचिरोली र.नं. 132 या संस्थेची निर्मीती वनविभागातील सर्व कर्मचारी यांना त्यांच्या आर्थिक बाबीशी निगडी संदर्भात सर्व सोई, सुविधा उपलब्ध करण्याच्या नितांत प्रेरणेने सन 2020-2021 या वर्षात पतसंस्थेची निर्मीती करण्यात आली आहे. यापुर्वी पतसंस्थेच्या कार्यालयीन कामकाजाकरीता स्वतःची इमारत नसल्यामुळे सदर पतसंस्थेचे कार्यभार उपवनसंरक्षक, गडचिरोली यांच्या कार्यालयाच्या मागील बाजुस उपलब्ध असलेल्या इमारतीत सुरु होते तथापी तीथे उपलब्ध असलेल्या सोई, सुविधांचा विचार करता उपलब्ध करुन दिलेली जागा कमी पडत असल्यामुळे पतसंस्थेला नविन जागेची/इमारतीची आवश्यकता होती. त्याअनुषंगाने दिनांक 03 डिसेंबर, 2023 रोजी पतसंस्थेचे जुन्या जागेवरुन नविन इमारतीत स्थलांतर करण्यात आलेले आहे. सदर नविन इमारतीतील प्राप्त झालेल्या जागेचे उदघाटन व प्रवेश प्रक्रीया दिनांक 03 डिसेंबर, 2023 रोजी सौ. वर्षाताई शेडमाके, माजी नगर सेवीका, गडचिरोली यांच्या उपस्थीतीत व त्यांच्या शुभहस्ते इमारतीतील प्राप्त जागेचे उदघाटन करण्यात आले.
सदर उदघाटन सोहळा श्री चंदु बावनवाडे, श्री उमेश बोरावार श्री सिध्दार्थ मेश्राम, श्री महेंद्र गावंडे, श्री अमित दंडेवार, श्री नितेश सोमलकर, श्री रुपेश मेश्राम, श्री धर्मराव दुर्गमवार, श्री दिनकर मोहुर्ले, श्री गुरुनाथ वाढई, श्री भारत साबळे, श्री सुरज ठाकुर, श्री गुरुदास टेकाम, कु. स्वाती गंड्रतवार, कु. झिनत सलामे व श्री रमेश बारसागडे या सर्व संचालक मंडळाच्या उपस्थीतीत पार पाडण्यात आला. सदर कार्यक्रमाकरीता पतसंस्थेचे सभासद श्री नरेंद्र रामटेके, श्री तारचंद म्हशाखेत्री, श्री भारत राठोड, श्री बळवंत येवले व श्री दुधराम महागणकर, श्री शैलेश बांबोळ व रामनगर वासीय उपस्थीत होते. सदर नविन इमारतीतील उपलब्ध जागेमुळे पतसंस्थेतील सर्व सदस्यांचे आर्थिक हित विचारात घेऊन पतसंस्था जोमाने कार्य करेल असे प्रतिपादन उदघाटक सौ. वर्षाताई शेडमाके, माजी नगर सेवीका, गडचिरोली यांनी विशद केले.
सदर पतसंस्थेशी संपर्क करण्याकरीता नविन कार्यालयाचा संपर्क पत्ता पुढील प्रमाणे आहे...
गडचिरोली जिल्हा वनकर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित, गडचिरोली र.नं. 132, पोटेगांव रोड, रामनगर वार्ड क्रमांक 20, हजारे आटाचक्की जवळ, गडचिरोली ता. जिल्हा. गडचिरोली पिन नंबर 442605