Gadchiroli : संतप्त अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांचा गडचिराेलीत जेलभराे आंदोलन.! - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

Advertise

Gadchiroli : संतप्त अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांचा गडचिराेलीत जेलभराे आंदोलन.!

दि. 2 जानेवारी 2024

Vidarbha News India 

Gadchiroli : संतप्त अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांचा गडचिराेलीत जेलभराे आंदोलन.!

विदर्भ न्यूज इंडिया 

गडचिरोली : विविध न्याय मागण्यांना घेऊन महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी युनियन आयटकच्या नेतृत्वात राज्यभरासह जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका, मदतनिसांनी डिसेंबरपासून काम बंद आंदोलन पुकारले आहे.

दरम्यान, महिला व बालविकास विभागाने आंदोलनामुळे बंद असलेले आहार वितरणावर पर्यायी व्यवस्था करण्याचे निर्देश देत पत्रक जाहीर केले आहे. दरम्यान, शासनाने प्रलंबित मागण्यांबाबत काेणतेही ठाेस निर्णय न घेतल्याने संतप्त अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांनी १ जानेवारी राेजी साेमवारी गडचिराेली येथे जेलभराे आंदाेलन केले. या आंदोलनाचे नेतृत्व आयटकचे देवराव चवळे, डाॅ. महेश काेपुलवार, जगदीश मेश्राम, जलील पठाण, संजय वाकडे, राधा ठाकरे, कविता चन्ने, मीनाक्षी क्षीरसागर आदींनी केले. आंदाेलनात रसिका कुथे, रेखा जांभुळे, प्रमिला मने, दुर्गा कुर्वे, ज्याेती काेमलवार, रूपा पेंदाम, रत्नमाला सरदारे आदींसह सहाशे ते सातशे महिला उपस्थित हाेत्या.

अंगणवाडी सेविका सहभागी झाल्या असून शासनस्तरावरून अद्यापही न्याय मिळाल्याने मागील चार आठवडाभरापासून सदर आंदोलन सुरूच आहे. या आंदोलनाअंतर्गत काम बंदसह जिल्हा परिषद कार्यालयासमोर धरणे आंदोलन देण्यात आले. अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या या काम बंद काही मागील आंदोलनामुळे दिवसांपासून जिल्हाभरातील अंगणवाड्या बंद असून लाभार्थ्यांना आहार वितरणाची प्रक्रिया ठप्प पडली आहे. ही गंभीर बाब लक्षात घेत महिला व बालकल्याण विभागाने आहार वितरणासाठी पर्यायी करण्याचे संबंधित अधिकाऱ्यांना फर्मान सोडले. २२ डिसेंबर रोजी व्हीसीद्वारे विशेष बैठक बोलावून याची होळी करीत नाराजी व्यक्त केली. विविध मागण्यांना घेऊन अंगणवाडी सेविका व मदतनिसांनी ४ डिसेंबरपासून राज्यव्यापी बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनात जिल्हाभरातील हजारो संदर्भांचे पत्रक जाहीर केले. या पत्रकामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर तोडगा न काढता पर्यायी व्यवस्था करण्याच्या या धोरणाचा निषेध करीत साेमवारला आंदोलनकर्त्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी जेलभराे आंदाेलन करीत शासनाच्या कामगार विराेधी धोरणाविरोधात घोषणाबाजी करीत निषेध व्यक्त केला.

महाराष्ट्र अंगणवाडी कर्मचारी युनियन आयटकच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन जि.प.च्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना इंगाेले यांच्यामार्फत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महिला व बालविकासमंत्री आदींना पाठविण्यात आले आहे.

या आहेत मुख्य मागण्या..

अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन वेतनश्रेणी लागू करण्यात यावी. अंगणवडी कर्मचाऱ्यांना मासिक पेन्शनचा कायदा करण्यात यावा. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युइटी, भविष्य निर्वाह निधी, सामाजिक सुरक्षा आदींचा लाभ देण्यात यावा. मिनी अंगणवाडी केंद्राचे नियमित अंगणवाडी केंद्रात रूपांतर करण्यात यावे. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना आजारपणाच्या रजा व खर्चपूर्ती देण्यात यावी.

महिला रुग्णालयाजवळ सभा...
संतप्त अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांचा माेर्चा धानाेरा मार्गावरील गाेंडवाना कलादालनातून दुपारी १ वाजता इंदिरा गांधी चाैकाच्या दिशेने निघाला. दरम्यान, पाेलिसांनी हा माेर्चा जिल्हा महिला रुग्णालयाजवळ थांबविला. दरम्यान, येथे विशाल सभा पार पडली. यावेळी डाॅ. महेश काेपुलवार, देवराव चवळे व इतर महिला पदाधिकाऱ्यांनी शासनाच्या अन्यायकारक धाेरणाचा खरपूस समाचार घेतला.

Share News

copylock

Post Top Ad

-->