दि. 21.01.2024
Vidarbha News India
Crime News : नोकरीची गरज असल्याचे म्हटला अन् महिलेच्या घरी जाऊन अत्याचार केला; बस प्रवासातील 'ती' ओळख ठरली कारणीभूत.!
- बसप्रवासात एका व्यक्तीने महिला प्रवाशासोबत ओळख निर्माण केली आणि नोकरीची आवश्यकता असल्याचे सांगून तिचे घर गाठले. त्यानंतर त्याने महिलेवर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला.!
विदर्भ न्यूज इंडिया
प्रतिनिधी/अमरावती : बसप्रवासात एका व्यक्तीने महिला प्रवाशासोबत ओळख निर्माण केली आणि नोकरीची आवश्यकता असल्याचे सांगून तिचे घर गाठले.
त्यानंतर त्याने महिलेवर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला. या धक्कादायक घटनेची तक्रार पीडित महिलेने 19 जानेवारी रोजी फ्रेजरपुरा पोलिस ठाण्यात नोंदविली. त्यानुसार पोलिसांनी आरोपी स्वप्निल बाबाराव किनकर (33, रा. शिक्षक कॉलनी, कारंजा घाडगे, जि. वर्धा) याच्याविरुध्द विविध कलमान्वये गुन्हा नोंदविला आहे.
पीडितेच्या तक्रारीनुसार, ती महिला गडचिरोली येथे कार्यरत आहे. त्यामुळे त्यांना अमरावतीवरून नेहमी गडचिरोली एसटी बसने प्रवास करावा लागतो. प्रवासादरम्यान आरोपी स्वप्निल किनकरने महिलेशी ओळख केली. मला नोकरी पाहिजे, असे सांगून तिच्याशी ओळख निर्माण केली. त्यावेळी गडचिरोलीत मदत करते, असे महिलेने त्याला सांगितले. त्यावेळी त्याने महिलेचा मोबाइल क्रमांकही घेतला. त्यानंतर स्वप्निलने महिला राहत असलेले भाड्याची खोली गाठली. तेथे तिला पाणी पिण्यासाठी मागितले. महिला स्वयंपाक गृहात पाणी आणण्यासाठी गेली असता, स्वप्निलने तिला जबरदस्तीने पकडून हॉलमध्ये आणले. त्यानंतर त्याने महिलेवर जबरदस्ती लैंगिक अत्याचार केला.
त्यावेळी महिलेने आरडाओरड केल्यामुळे स्वप्निल तेथून पळून गेला. या घटनेनंतर महिलेने घरमालकीणला माहिती दिली. महिला खुप घाबरली होती. त्यामुळे तिने बसने अमरावतीचे घर गाठले. त्यानंतर सुध्दा स्वप्निलने सदर घटना कोणाला सांगितली, तर जीव मारून टाकेन, अशी धमकी महिलेला दिली. त्यामुळे महिलेने या घटनेची माहिती पतीला दिली. त्यानंतर महिलेने फ्रेजरपुरा पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी आरोपी स्वप्निल किनकरविरुध्द गुन्हा नोंदविला आहे.