दि. 26.01.2024
"जाणता राजा" या महानाट्याच्या महाआरतीचा मान आमदार डॉ. देवराव होळी यांना.!
- हजारोंच्या उपस्थितीत "जाणता राजा" महानाट्याचे आमदार डॉ. देवराव होळी यांच्या हस्ते उद्घाटन.!
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : गडचिरोली एमआयडीसी परिसरात राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने नियोजित "जाणता राजा" या महानाट्याचे २५,२६ व २७ जानेवारी रोजी प्रयोग नियोजित असून दिनांक २५ रोजी झालेल्या या महानाट्याच्या प्रयोगाचे उद्घाटन आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी झालेल्या महाआरतीचा मान आ. डॉ. देवराव होळी यांना देण्यात आला.
याप्रसंगी पद्मश्री डॉ.श्री परशुराम खुणे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा संघचालक घिसुलालजी काबरा, अतिरिक्त जिल्हाधिकारी धनाजी पाटील, निवासी जिल्हाधिकारी सूर्यवंशी साहेब, भाजपा लोकसभा समन्वयक प्रमोदजी पिपरे, माजी नगराध्यक्ष सौ. योगीताताई पिपरे, यांचे सह वरिष्ठ अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.