दि. 5 जानेवारी 2024
Vidarbha News India
MD बालसुब्रमण्यम प्रभाकरण यांना गडचिरोली जिल्हा गौरव पुरस्काराने सन्मानित.!
Balasubramaniam Prabhakaran :
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : गडचिरोली प्रेस क्लबच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त दिला जाणारा यावर्षीचा 'गडचिरोली जिल्हा गौरव' पुरस्कार लॉयड्स मेटल अँड एनजी लिमिटेटचे मॅनेजींग डॉयरेक्टर बालसुब्रमण्यम प्रभाकरण यांना जाहीर झाला आहे.
गडचिरोली येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात त्यांना सदर पुरस्काराने राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे.
जिल्ह्यात उल्लेखनिय काम करणार्या एका विशिष्ठ व्यक्तिमत्वाला गडचिरोली प्रेस क्लबतर्फे दरवर्षी 'गडचिरोली जिल्हा गौरव' पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. याच धर्तीवर उद्योगविरहित गडचिरोलीसारख्या आदिवासी जिल्ह्यात उद्योग उभारुन येथील हजारो बेरोजगारांच्या हाताला रोजगार उपलब्ध करून देणारे लॉयड् मेटल अँड एनजी लिमिटेडचे मॅनेजींग डॉयरेक्टर Balasubramaniam Prabhakaran बालसुब्रमण्यम प्रभाकरण यांना यावर्षीचा गडचिरोली जिल्हा गौरव बहाल करण्यात येणार आहे. येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात सायकाळी 6 वाजता पत्रकार दिनानिमित्त' गडचिरोली जिल्हा गौरव पुरस्कार प्रदान सोहळ' आयोजिन करण्यात आला आहे.
यावेळी राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा यांच्या हस्ते या पुरस्काराने वितरण करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रेस क्लबचे अध्यक्ष नंदकिशोर काथवेट राहणार आहेत. तर विशेष अतिथी म्हणून सहकार महर्षी अरविंद सावकार पोरेड्डीवार, खासदार अशोक नेते, आमदार डॉ. देवराव होळी, आमदार कृष्णा गजबे आदी उपस्थित राहणार आहे. या Balasubramaniam Prabhakaran कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन प्रेस क्लब गडचिरोलीच्या वतीने करण्यात आले आहे.